अकोल्यात दोन व्यक्तीतील संवाद व्हायरल केल्याने राडा; दोघेही अटकेत

90
अकोल्यात दोन व्यक्तीतील संवाद व्हायरल केल्याने राडा; दोघेही अटकेत
अकोल्यात दोन व्यक्तीतील संवाद व्हायरल केल्याने राडा; दोघेही अटकेत

अकोला शहरात गेल्या शनिवारी, १३ मे रोजी रात्री झालेली दगडफेक व राडा हा दोन व्यक्तींमधील इन्स्टाग्रामवरील संवादावरुन घडला. पोलिसांनी या दोन्ही व्यक्तींना अटक केली आहे. मात्र दोन व्यक्तींमधील संवाद व्हायरल कुणी व का केला? त्यानंतर तक्रार द्यायला एवढा जमाव का आला? याचा मागे खरे सूत्रधार कोण आहेत? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधत असून लवकरच तथ्य समोर येईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली.

शनिवारी २० मे रोजी त्यांनी पत्रकारांशी या प्रकरणावर संवाद साधला. या घटनेच्या पूर्वरात्री एकच्या सुमारास दोन व्यक्तींमध्ये संवाद झाला. तो व्हायरल करुन एका गटाने जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर प्रकरणात आतापर्यंत एकूण १४८ जणांना ताब्यात घेतले आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करीत आहे. शहरात आता जीवन पूर्वपदावर येत असून कुणीही अफवा पसरविण्याचा पॅनिक कॉल करण्याचा प्रयत्न करु नये. अकोल्यातील दंगलीत एका निष्पाप विलास गायकवाड यांचा मृत्यू झाला असून डोक्याला जबर मार लागून झालेल्या रक्तस्त्रावाने मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात समोर आले आहे. त्यांचे नेमके मारेकरी कोण? याचाही तपास पोलीस घेत आहे. पोलिसांच्या तपासात अनेक पुरावे समोर आले असून लवकरच तथ्य समोर येईल, असेही ते म्हणाले.

(हेही वाचा – विक्रोळी आणि भांडूप भागातील डोंगर उतारावर राहणाऱ्यांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरीत व्हावे; महापालिकेचे आवाहन)

पोलीस हायअलर्टवर

या घटनेमुळे सर्वात आधी पोलिसांनी जनजीवन सुरळीत करुन शांतता निर्माण करण्यावर भर दिला. आता प्रकरणातील दोषींवर अंकुश लावणार आहे. दरम्यान पोलिसांनी शहरातील हायराईज पॉईंट निवडले असून अशा उंच इमारती, पाण्याच्या टाक्या येथूनही गल्लीबोळांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. तसेच अनेक ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असून पायी व वाहनाने गस्त सुरू आहे. तपासासाठी वेगळ्या पथकाचे गठण केले असून चार एसआरपीएफ व तीन रॅपीड अॅक्शन फोर्सच्या तुकड्या तैनात आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षकांनी दिली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.