Twitter Outage : मंगळवारी तुमचंही ट्विटर अचानक बंद झालं होतं का?

Twitter Outage : डाऊनडिटेक्टरने काही देशांमध्ये मंगळवारी रात्री ट्विटर बंद असल्याचं म्हटलं आहे.

77
Twitter Outage : मंगळवारी तुमचंही ट्विटर अचानक बंद झालं होतं का?
  • ऋजुता लुकतुके

ट्विटर हे समाज माध्यम टेस्ला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांनी घेतल्यापासून ते काही ना काही कारणांनी गाजतंय. मस्क यांनी ट्विटरला एक्स असं नवीन नाव दिलं आहे. मंगळवारी २७ ऑगस्टला काही देशांमध्ये हजारो ट्विटर खाती बंद असल्याचं आता निदर्शनास आलं आहे. यामागे काही तांत्रिक अडचणीच असाव्यात असा प्राथमिक अंदाज आहे. (Twitter Outage)

(हेही वाचा – BMC School CCTV Camera : शिक्षणाधिकाऱ्यांच्या निलंबनामागे दडलेय काय?)

डाऊन डिटेक्टर हे समाज माध्यमांचा अभ्यास करणारं एक ॲप आहे. आणि त्यांनी कॅनडात ३,३०० आणि युकेमध्ये १,३०० ग्राहकांनी ट्विटर बंद असल्याच्या तक्रारी केल्याचं म्हटलंय. डाऊन डिटेक्टर हे ॲप समाज माध्यमांवर नजर ठेवून असतं. आणि त्यातील संदेशाची दळण वळण तसंच तांत्रिक गोष्टींवरही त्याचं लक्ष असतं. युकेच्या स्थानिक वेळेनुसार, रात्री साडे अकरा वाजता ट्विटर बंद झालं होतं, असं डाऊन डिटेक्टरचं म्हणणं आहे. (Twitter Outage)

(हेही वाचा – Duleep Trophy : दुलिप करंडकाच्या पहिल्या फेरीतून मोहम्मद सिराज, उमरान मलिक यांना विश्रांती)

आणि जवळ जवळ ३६,००० ट्विटर खाती काही काळासाठी बंद होती, असाही दावा त्यांनी केला आहे. अमेरिकेतही अनेक ठिकाणी ही समस्या भेडसावली असं डाऊन डिटेक्टर डॉट कॉम या वेबसाईटवरही म्हटलं आहे. डाऊन डिटेक्टरच्या हवाल्याने रॉयटर्स वृततसंस्थेनं ही बातमी दिली असून ट्विटर किंवा एक्स कंपनीने त्यावर अजून कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. (Twitter Outage)

(टीप – ही बातमी अपडेट होत आहे.)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.