Tripura Bypolls : त्रिपुरामध्ये भाजपचा दणदणीत विजय

धनपूरमधून भाजपा उमेदवार बिंदू देबनाथ यांनी माकप उमेदवार कौशिक चंद्रा यांचा १८ हजार ८७१ मतांनी पराभव केला.

25
भाजप

सहा राज्यांतील विधानसभेच्या सात जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. यासाठीचे मतदान ५ सप्टेंबर रोजी शांततेत पार पडले. दुसरीकडे भाजपने त्रिपुराच्या धनपूर (Tripura Bypolls)आणि बॉक्सानगर जागा जिंकल्या आहेत.

धनपूरमधून भाजपा उमेदवार बिंदू देबनाथ यांनी माकप उमेदवार कौशिक चंद्रा यांचा १८ हजार ८७१ मतांनी पराभव केला. देबनाथ यांना ३००१७ मते मिळाली, तर कौशिक यांना केवळ १११४६ मतांवर समाधान मानावे लागले. बॉक्सानगर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार तफज्जल हुसेन ३० हजार २३७ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांना ३४४१६ मते मिळाली, तर माकपचे उमेदवार मिझान हुसेन यांना केवळ ३९०९ मते मिळाली.

हेही पहा

५  सप्टेंबर रोजी पश्चिम बंगाल, झारखंड, त्रिपुरा, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या सात जागांवर पोटनिवडणूक झाली होती. या पोटनिवडणुकांना भारतीय जनता पक्ष (भाजप) विरुद्ध विरोधी पक्षांची  आघाडी असलेल्या ‘INDIA पहिली निवडणूक चाचणी’ म्हटले जात आहे. ५ सप्टेंबर रोजी त्रिपुरा, बॉक्सानगर आणि धनपूर या दोन जागांसाठी, पश्चिम बंगालमधील धुपगुरी, झारखंडमधील डुमरी, उत्तराखंडमधील बागेश्वर आणि उत्तर प्रदेशातील घोसी विधानसभेच्या जागेसाठी मतदान झाले होते.

(हेही वाचा G-20 Summit : दिल्लीतील शिखर संमेलनात उलगडणार 5 हजार वर्षांचा इतिहास, पाहुण्यांचे स्वागत करणार AI अँकर)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.