ट्वीटरवर ट्रेण्ड होत आहे #IndianMuslims; काय आहे कारण ?

126
ट्वीटरवर ट्रेण्ड होत आहे #IndianMuslims; काय आहे कारण ?
ट्वीटरवर ट्रेण्ड होत आहे #IndianMuslims; काय आहे कारण ?

हिजबुल्लाह या आतंकवादी संघटनेला आसरा दिल्यानंतर इस्रायलने लेबेनॉनवर जोरदार हल्ला चढवला आहे. इस्रायलने दक्षिण बैरूतसह लेबेनॉनमध्ये हवाईहल्ले वाढवले आहेत. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत ३३ जण ठार, तर १९५ जखमी झाले आहेत. इस्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्लाहचा प्रमुख सय्यद हसन नसराल्लाह याचाही खात्मा झाला आहे. नसराल्लाह याचा हल्ला झाल्यानंतर भारतातील धर्मांध मुसलमानांनी निषेध मोर्चे काढण्यात येत आहेत.

(हेही वाचा – Nagpur Hit And Run Case : भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू; पोलीस घटनास्थळी दाखल )

रविवार, २९ सप्टेंबर रोजी रात्री लखनऊमध्ये शिया समुदायाचे 10,000 लोक रस्त्यावर उतरले. लोकांनी 1 किलोमीटरचा कँडल मार्च काढला. आंदोलकांनी घरांवर काळे झेंडे लावले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे पोस्टर जाळले आणि घोषणाबाजी केली. मजलिस वाचल्यानंतर त्यांनी नसरल्लाच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. आतंकवाद्याच्या मृत्यूवर शिया समुदायाने लखनऊमध्ये 3 दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. सुलतानपूरमध्येही शिया समाजाच्या लोकांनी निदर्शने केली. ‘हसन नसरुल्लाह जिंदाबाद’, ‘अमेरिकेला आग लावा’ अशा घोषणा देण्यात आल्या. जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. पीडीपीच्या प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी नसरल्लाहच्या हत्येनंतर श्रद्धांजली म्हणून रविवार, २९ सप्टेंबर रोजी एक दिवस निवडणुकीचा प्रचार करणार नाही, असे घोषित केले आहे. देशभरात अनेक प्रमुख शहरांमधील मुसलमान नसरुल्लाहच्या हत्येचा विरोध होत आहे. लेबेनॉनमध्ये मारल्या गेलेल्या आतंकवाद्याचे भारतीय मुसलमान समर्थन करत असतांना बांगलादेशातील अल्पसंख्यांकांवरील हल्ल्यांकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. बांगलादेशात सत्तापालट झाल्यानंतर तेथील हिंदूंवर अनन्वित अत्याचार होत आहेत. असे असूनही मुसलमानबहुल असलेला बांगलादेश सोडाच, भारतातील एकाही मुसलमानाने त्यावर चकार शब्द काढलेला नाही.

या पार्श्वभूमीवर ट्वीटरवर भारतीय मुसलमानांच्या या प्रवृत्तीवर बोट ठेवले जात आहे. ट्वीटरवर ३० सप्टेंबर रोजी सकाळी #IndianMuslims हा हॅशटॅग ट्रेण्ड झाला. यामध्ये अनेकांनी वेगवेगळ्या प्रसंगांचा उल्लेख केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.