पुन्हा Train Accident : आसाम-आगारतळा एलटीटी एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले

125
Train Accident : आसाम-आगारतळा एलटीटी, एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
Train Accident : आसाम-आगारतळा एलटीटी, एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

मागील काही दिवसांपासून रेल्वे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. गुरुवार १७ ऑक्टोबर रोजी आसाममध्ये रेल्वे अपघात  (Assam Railway Accident) झाला.  गुरुवारी दुपारी ३.५५ वाजता हा अपघात झाल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात ट्रेनचे ८-१० डबे रुळावरून घसरले आहेत. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती रेल्वे प्रवक्त्याने दिली आहे.   (Train Accident )

आगरतळा ते मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस (Agartala to Mumbai’s Lokmanya Tilak Terminus Train accident) दरम्यान धावणारी ट्रेन डिबालोंग स्थानकावरून (Dibalong Station) जात असताना रुळावरून घसरली. रुळावरून घसरण्याचे कारण अद्याप समजू शकलं नाही. या अपघाताचा परिणाम इतर रेल्वे सेवेवर होऊ नये म्हणून रुळावरून डबे हटवण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

(हेही वाचा – Assembly Election 2024 : घाटकोपर पश्चिमसाठी शिवसेनेकडे चांगला उमेदवार असल्यास भाजपा करणार जागेची अदलाबदली)

अपघातानंतर रेल्वेचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. याशिवाय अधिक माहिती किंवा मदत मिळवण्यासाठी रेल्वेने हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. ०३६७४ २६३१२० आणि ०३६७४ २६३१२६ या क्रमांकावर संपर्क साधून कोणतीही व्यक्ती अपघाताशी संबंधित माहिती किंवा मदत मिळवू शकते.

अपघाताची माहिती मिळताच आसामचे मुख्यमंत्री हिमंता विश्व शर्मा (CM Himanta Vishwa Sharma) यांनीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट केली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ”गुरुवारी १५:५५ वाजता डिबालोंग स्टेशनवर आगरतळा-एलटीटी एक्स्प्रेस क्रमांक १२५२० ट्रेनचे ८ डबे रुळावरून घसरले. प्रवाशांचे मोठे नुकसान झाले नसून सर्व प्रवासी सुखरूप आहेत. आम्ही रेल्वे अधिकाऱ्यांशी समन्वय साधत असून लवकरच मदत घटनास्थळी पोहोचेल.” 

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.