Zika virus : राज्यात ‘या’ जिल्ह्यात आता झिका व्हायरसचा शिरकाव

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथे झिका व्हायरसचे तीन रूग्ण सापडले आहेत.

30
Zika virus : राज्यात 'या' जिल्ह्यात आता झिका व्हायरसचा शिरकाव
Zika virus : राज्यात 'या' जिल्ह्यात आता झिका व्हायरसचा शिरकाव

यंदाच्या वर्षी मुंबईत चेंबूर येथे झिका व्हायरसचा पहिला रुग्ण सापडल्याची घटना ताजी असतानाच कोल्हापुरात झिका व्हायरसचे तीन नवे रुग्ण सापडले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथे झिका व्हायरसचे तीन रूग्ण सापडले आहेत. त्यापैकी एक डॉक्टर असून उर्वरित दोन जणांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरच्या सद्यस्थितीबद्दल आरोग्य विभागाने तपशीलवार माहिती दिली नाही.

कोल्हापूर जिल्ह्यात १ सप्टेंबरला झिका व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला. इचलकरंजी प्राथमिक आरोग्य केंद्रात झिका व्हायरसचा पाहिला रुग्ण तर दुसऱ्या दिवशी २ सप्टेंबरला दोन रुग्ण आढळले. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही रुग्णांचे रक्तजल नमुने पुणे येथील एनआयव्हीकडे खासगी प्रयोशाळेमार्फत पाठविण्यात आले असून अद्याप अहवाल प्रलंबित आहेत. कोल्हापूरातील ३८ वर्षीय न्युरोफिजिशियनला सर्वात पहिल्यांदा झिका व्हायरसची लागण झाली. डॉक्टर अरविंद बळवंत कुलकर्णी असे या रुग्णाचे नाव आहे.

रुग्णभेटी निमित्ताने डॉक्टर बरेचदा वेगवेगळ्या गावांना भेटी देत असतात. २४ ऑगस्टला डॉक्टरांनी रत्नागिरी जिल्ह्यात डॉक्टर पारकर रुग्णालयात रुग्ण भेटीसाठी गेले होते. कामानंतर डॉक्टर कुलकर्णी यांनी गणपतीपुळे परिसराला भेट दिली. येथील पार्किंग परिसरात मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दुसऱ्या दिवशी कोल्हापुरात परतल्यानंतर त्यांना ताप, सर्दीचा त्रास होऊ लागला. २९ ऑगस्टला अंबिका प्रयोगशाळेमध्ये रुग्णाचा रक्तजल नमुना तपासणीसाठी दिला. झेंडा चौक येथील महिला झिका व्हायरसची दुसरी रुग्ण ठरली तर तिसरा रूग्ण कागवडे मळा येथील पुरूष आहे. या दोन्ही रूग्णांना अलायन्स रूग्णालयात दाखल करण्यात आले . या पॉझिटीव्ह रुग्णांच्या घरी ६ व्यक्ती रहातात त्यापैकी ३ जणांचे रक्तजल नमुने तपासणी करिता घेतले आहेत.

एडीस व्हायरसबद्दल –

झिका आजार झिका व्हायरसमुळे होतो. हा आजार सौम्य स्वरूपाचा असतो. झिका आजार संक्रमित एडिस डासांमुळे पसरतो. झिका डास डेंग्यू आणि चिकनगुनिया या आजारांचाही प्रसार करतात. हा आजार विषाणूजन्य असला तरी कोविड सारखा वेगाने पसरत नाही.

लक्षणे –

ताप, त्वचेवर पुरळ येणे, डोळे येणे, स्नायू आणि सांधेदुखी, अस्वस्थता आणि डोकेदुखी.
झिका व्हायरस रोग हा एक स्वयं मर्यादित आजार आहे. झिका व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तींपैकी ८० टक्के व्यक्ती लक्षणे विरहित असतात.

(हेही वाचा – Veer Sawarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरी विशेष कारागृहातून मुक्त होण्याला 100 वर्षे पूर्ण, ‘हॅलो सह्याद्री’ कार्यक्रमाद्वारे स्मृतींना उजाळा)

नागरिकांना आवाहन –

  • नागरिकांनी घाबरून जाऊ नये.
  • डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी सर्व पाण्याच्या टाक्या आणि कंटेनर घट्ट झाकणांनी झाकून ठेवा.
  • वापरात नसलेले सर्व कंटेनर,चंक मटेरियल, टायर, नारळाचे गोळे इत्यादींची विल्हेवाट लावा. शक्यतो नष्ट करा.
  • घर आणि हॉटेलमध्ये शोभेच्या टाक्यांमध्ये लाव्हीव्हरी माशांचा वापर करा.
  • साप्ताहिक ड्राय डे साजरा करा. घरात किंवा उपहारगृहात आठवडाभर पाणी धरून ठेवणारे सर्व कंटेनर स्वच्छ धुवा आणि रिकामे करा.
स्वसंरक्षणासाठी –

झिका व्हायरस डासाच्या चाव्यापासून वाचण्यासाठी घरी किंवा रुग्णालयात बेडनेटचा वापर करा. डास प्रतिबंधक औषध घरात लावा. अंग झाकेल असे कपडे घाला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.