Poonam Chambers मागील मार्कडेश्वर झोपडपट्टीकडे जाणारा मार्ग अजून मोकळा

554
Poonam Chambers मागील मार्कडेश्वर झोपडपट्टीकडे जाणारा मार्ग अजून मोकळा
  • सचिन धानजी, मुंबई

वरळीतील पुनम चेंबर्सच्या (Poonam Chambers) मागील बाजूस असलेल्या मार्कडेश्वर झोपडपट्टीकडे जाणारा मार्ग आता रुंद केला जाणार आहे. सध्या या झोपडपट्टीकडे जाणारा रस्ता ६ मीटर रुंदीचा असून आता नव्याने हा रस्ता १२ मीटर रुंदीचा केला जाणार आहे. या रुंदीकरण केलेल्या मार्गावरून सागरी किनार रस्ता येथी खुले मैदान आणि बस बे येथील एनी बेझंट मार्गापर्यंत जाणार आहे. एकूण १२ ते १४ मीटर रुंदीच्या मार्गावर वाहनांसाठी तसेच पादचाऱ्यांसाठी मार्ग असेल.

मार्कडेश्वर झोपडपट्टी ही पुनम चेंबर्सच्या मागील बाजुस असून या झोपडपट्टीत सुमारे ९०० ते १००० झोपड्रया आहेत एनी बेझंट मार्गापर्यंत जाणार आहे. सुमारे ५ हजारांहून अधिक लोकवस्ती असलेल्या या झोपडपट्ट वसाहतीला डॉ. ऍनी बेझंट मार्गापासून केवळ एकमेव प्रवेश मार्ग असून या रस्त्याची रुंदी फक्त ६ मीटर एवढी आहे. ही वसाहत चारही बाजूंनी खासगी भूभागांनी वेढलेली असून येथील संरक्षक भिंतीमुळे झोपडपट्टीवासियांची कोंडी होते. त्यामुळे या वसाहतीतील लोकांना केवळ ६ मीटर रस्त्याचाच वापर करावा लागते. मार्कडेश्वर नगर वस्तीतील घरे अतिशय दाटीवाटीने असल्याने आगीसारख्या दुर्घटना घडल्यानंतर आपत्तीच्यावेळी अग्निशमन दलाच्या वाहनांना तिथे पोहोचण्यास विलंब होतो. त्यामुळे या मार्गाची रुंदी १८ मीटर पर्यंत करण्याची मागणी केली होती.

(हेही वाचा – PPF Account New Rules : ऑक्टोबरपासून पीपीएफ खात्यांविषयी ‘हे’ नियम बदलणार)

या वसाहतीला महापालिकेच्या रस्त्यापासून पोहोच मार्ग नाही, हा मार्ग मार्कंडेश्वर झोपडपट्टी पुनर्विकास योजनेमध्ये समाविष्ट असल्याने एसआरएने येथील रहिवाशांच्या मागणीचा विचार केला जाऊ शकतो असा अभिप्राय दिला आहेत. त्यातच कोस्टल रोडवर नव्याने बनवण्यात येणाऱ्या मनोरंजनासाठीच्या खुल्या मैदानासाठी तसेच बस बे येथे ऍनी बेझंट मार्गापासून पोहोच मार्ग बनवण्याचे नियोजित असल्याने या मार्गाचे रुंदीकरण करण्याचे ठरवले आहे. बस बे आणि प्रोमोनेडला डॉ. ऍनी बेझंट मार्गापासून कोणताही पोहोच रस्ता उलब्ध नसल्याने तसेच सागरी किनारा प्रकल्पांतर्गंत रजनी पटेल ते बडोदा पॅलेस पर्यंत समुद्राच्या बाजूने तात्पुरती रस्ता उपलब्ध असल्याने भविष्यात मनोरंजनासाठी खुल्या मैदानासाठी कायमस्वरुपी रस्त्याची गरज असल्याने याचा विचार करता सहा मीटर रुंदीचा रस्ता १२ ते १४ मीटर रुंदीचा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्याच्या या रस्त्याची रुंदी ६.३० मीटर असून लांबी ८० मीटर आहे. या रस्त्यावर महापालिकेची मलवाहिनी असून इलेक्ट्रील पोल नाही. त्यामुळे वाहतुकीसंदर्भात नेमलेल्या टंडन अर्बन सोल्यूशन्स कंपनीने बनवलेल्या अहवालात ऍनी बेझंट मार्गापासून वाहतुकीच्या या रस्त्याची रुंदी काही ठिकाणी १२ मीटर तर काही ठिकाणी १८ मीटर रुंदीची करण्याचा शिफारस केली आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत राखण्यासाठी १८ मीटर रुंद आणि १८० लांब आणि १२ मीटर रुंद आणि १२० मीटर लांबीचे रस्ते बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Poonam Chambers)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.