Koliwada Gavthan : कोळीवाडा-गावठाणमधील घरे होणार नियमित?

बैठकीत मुंबई शहर व उपनगरामध्ये कोळीवाड्यांच्या गावठाण व विस्तारित गावठाण यांच्या सिमांकनाचा मुद्दा घेण्यात आला.

24
Koliwada Gavthan : कोळीवाडा-गावठाणमधील घरे होणार नियमित?
Koliwada Gavthan : कोळीवाडा-गावठाणमधील घरे होणार नियमित?

मुंबई शहर व मुंबई उपनगरातील कोळीवाडा-गावठाण मधील वापरातील वहिवाटेतील घरांना मार्गदर्शक तत्वाअंतर्गत नियमित करण्यात येणार असून त्या त्या कोळीवाडा-गावठाण येथील नियमावलीतील विनिमय व विकास नियंत्रण नियमावली च्या कायद्याअंतर्गत या घरांना नियमित करण्याचे ठरविण्यात येईल, असे मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत ठरविण्यात आले आहे. (Koliwada Gavthan)

मुंबईतील कोळीवाडा-गावठाणच्या सिमांकनाच्या प्रलंबित विषया संदर्भात मुख्यमंत्री यांचे अप्पर प्रधान सचिव भुषण गगरानी यांच्या अध्यक्षतेखाली व शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्या पुढाकाराने त्यांच्या दालनात गुरुवारी २६ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता बैठक पार पडली. या बैठकीत कोळीवाडा गावठाण समितीच्या नियुक्त सदस्य उज्ज्वला पाटील, पंकज जोशी, वेदांत काटकर, राजेश मांगेला, गिरीश साळगांवकर आदी उपस्थित होते. (Koliwada Gavthan)

बैठकीत मुंबई शहर व उपनगरामध्ये कोळीवाड्यांच्या गावठाण व विस्तारित गावठाण यांच्या सिमांकनाचा मुद्दा घेण्यात आला. कोळीवाडा-गावठाण व विस्तारित कोळीवाडा गावठाण यांचे कमाल चटई क्षेत्र निर्देशांक अर्थात एफएसआय अनुज्ञेय करण्याचा शासन निर्णय प्रस्तावित करण्याचा व विकास आराखड्यात त्या संबंधीच्या बदल करून प्रत्यक्ष कोळीवाडा-गावठाण यांचे निरीक्षण करून नगर विकास विभागाचे अप्पर प्रधान सचिव असिम गुप्ता यांच्या समवेत सादर करण्याचे ठरवले आहे. (Koliwada Gavthan)

(हेही वाचा – DHFL Bank Scam : बँक घोटाळा प्रकरणातील वाधवान बंधूंची ७०.३९ कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त)

मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्या समवेत या संदर्भित चर्चेदरम्यान कोळीवाडा-गावठाण मधील वापरातील वहिवाटेतील घरांना मार्गदर्शक तत्वाअंतर्गत नियमित करण्यात येतील. पण त्याकरिता त्या त्या कोळीवाडा गावठाण येथील नियमावलीतील विनिमय व विकास नियंत्रण नियमावलीच्या कायद्याअंतर्गत नियमित करण्याचे ठरविण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला. (Koliwada Gavthan)

कोळीवाडा गावठाण व त्यातील विस्तारित क्षेत्र याचे अंतिम सर्वेक्षण महसूल विभागाच्या अंतिम मंजुरीसाठी पाठविण्याचे या बैठकीत ठरले. यामुळे सर्व कोळीवाडे, गावठाण व आदिवासी पाडे संरक्षित होऊन त्यांच्या वापरातील जागांवर अतिक्रमण होऊ शकणार नाही अशी मार्गदर्शक तत्त्वे ठरविण्यात येईल. त्याची प्रत झोपडपट्टी प्राधिकरण, जिल्हाधिकारी शहर व उपनगर तसेच महानगरपालिकेला सादर करावी असे निर्णयाअंति ठरले. कोळीवाडा गावठाण मधील असलेल्या दोष दुरूस्ती अहवाला संबंधित प्रत्येक कोळीवाडा गावठाणातील नियुक्त सदस्य आपले अहवाल शासनास व कोळीवाडा -गावठाण समितीस सादर करतील व त्यावर उचित कारवाई केली जाईल असे या बैठकीत ठरले. (Koliwada Gavthan)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.