भाजपाची पहिली यादी जाहीर होताच उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची प्रतिक्रिया, म्हणाले…   

189
CM Devendra Fadnavis मनसेबाबत स्पष्टच म्हणाले, …शक्य असेल तिथे सोबत घेऊ!

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी (Maharashtra Assembly Elections 2024) भाजपाने रविवारी ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. तर या यादीमध्ये काही नवीन चेहऱ्यांचाही समावेश आहे. भाजपाची पहिल्या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule), मंत्री चंद्रकांत पाटील, आशिष शेलार (Ashish Shelar) आदी दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. (Devendra Fadnavis)

या यादीवर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘भारतीय जनता पार्टीने मला विधानसभा निवडणूकीसाठी सहाव्यांदा संधी दिली. भारतीय जनता पार्टीने (Bhartiya Janta Party) पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दाखविल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी (PM Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह आणि मा. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डाजी (J. P. Nadda) तसेच केंद्रीय निवडणूक समितीतील सर्व सन्माननीय नेत्यांचा मी नितांत आभारी आहे.’

याशिवाय, ‘भाजपाच्या पहिल्या यादीत माझ्याव्यतिरिक्त आणखी ९८ उमेदवार जाहीर झाले आहेत, त्यात आपले प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचाही समावेश आहे. त्यांच्यासह या उमेदवार यादीतील सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा!’ (Devendra Fadnavis)

(हेही वाचा – BJP Candidate List : मुंबईतल्या १४ जागांवर भाजपाचे ‘हे’ उमेदवार ठरले; जाणून घ्या त्यांची नावे)

तसेच ‘पक्षनेतृत्त्व, माझ्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातील (Nagpur South-West Constituency) नागरिक आणि माझ्या महाराष्ट्रातील मायबाप जनतेने सातत्याने दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्याचाच माझा प्रयत्न असेल.’ असंही फडणवीसांनी (Devendra Fadnavis) म्हटले आहे.

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.