पुष्पक एक्सप्रेस (Pushpak Express) दुर्घटनेतील 12 मृतांपैकी सात मृतांची ओळख पडली आहे. यातील चारजण नेपाळचे आहेत. त्यामुळे पोलीस आता या मृतांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधत आहेत. या भीषण अपघातात (Train Accident) आतापर्यंत 13 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 25 जखमी झाले आहेत. जखमींवर जळगाव आणि पाचोरा (Pachora) येथील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Jalgaon Train Accident)
हेही वाचा-सत्तेवर येताच Donald Trump अॅक्शन मोडवर ; पुतिन यांना दिला युद्ध थांबविण्याचा इशारा
आता जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती प्रशासनाने दिली असून आता 13 मृतांपैकी 7 मृतांची ओळख पटली आहे. यात नेपाळमधील (Nepal) चार जणांचा तर उत्तर प्रदेशातील तीन जणांचा समावेश आहे. (Jalgaon Train Accident)
हेही वाचा-Jalgaon Train Accident : मृतांची संख्या १३, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले दु:ख
जळगाव जिल्हा रुग्णालयात (Jalgaon Hospital) सध्या मृतकांचे नातेवाईक जमायला सुरुवात झाली आहे. मृतांमध्ये चार जण नेपाळचे असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांचे नातेवाईक पुणे आणि मुंबई येथून जळगाव येथे पोहचले आहेत. या अपघातात मृत्यू झालेल्यांचे पार्थिव आज (23 जाने.) त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात येणार आहे, तर काही मृतांवर जळगाव येथेच अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. (Jalgaon Train Accident)
मृतांची नावे पुढीलप्रमाणे : (Jalgaon Train Accident)
1. कमला नवीन भंडारी (43, नेपाळ, हल्ली मुक्काम कुलाबा ),
2. लच्छीराम खमू पासी (40, नेपाळ)
3. इम्तियाज अली (35, उत्तरप्रदेश)
4. नसरुद्दीन बद्रुद्दीन सिद्दीकी (19, उत्तरप्रदेश)
5. जवकला भटे जयकडी (80, नेपाळ)
6. हिनू नंदराम विश्वकर्मा (10, नेपाळ)
7. बाबू खान (27 वर्षे, उत्तरप्रदेश)
जखमींची नावे पुढीलप्रमाणे : (Jalgaon Train Accident)
1. अबू मोहम्मद (30, तालबाघौडा, जि. श्रावस्ती, उत्तर प्रदेश)
2. हकीम अन्सारी (45, तिलवार रतनपूर, जि. श्रावस्थी, उत्तर प्रदेश)
3. हसन अली (19, गिलोला, जि. बहराइच, उत्तर प्रदेश)
4. विजयकुमार गौतम (33, बेलपूर बगई, जि. बहराइच, उत्तर प्रदेश)
5. उत्तम हरजन (25, बेलपूर बगई, जि. बहराइच, उत्तर प्रदेश)
6. मोहम्मद निब्बर (31, डिकौली, जि. श्रावस्थी, उत्तर प्रदेश)
7. उजाला सावंत (38, अछाम, जि. मंगलसेन, नेपाळ)
8. दिपक थापा (18, दुल्लू (नगरपालिका) जि. दहिलोक, नेपाळ)
9. धर्म बहादूर सावंत (8, अछाम, जिल्हा. मंगलसेन, नेपाळ)
10. मंजू परिहार (25, दुल्लू (नगरपालिका) जि. दहिलोक, नेपाळ)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community