Pandharpur येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची दर्शन रांग होणार अधिक सुसज्ज ; सरकारची ‘एवढ्या’ कोटींची तरतूद

171
Pandharpur येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची दर्शन रांग होणार अधिक सुसज्ज ; सरकारची 'एवढ्या' कोटींची तरतूद
Pandharpur येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची दर्शन रांग होणार अधिक सुसज्ज ; सरकारची 'एवढ्या' कोटींची तरतूद

महाराष्ट्र राज्यामध्ये पर्यटन विकसित करुन त्याद्वारे स्थानिक अर्थव्यवस्था वृद्धिंगत करण्याकरीता आणि स्थानिकांना रोजगाराची संधी निर्माण करण्यास मोठा वाव असल्याची वस्तुस्थिती लक्षात घेऊन तसेच महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल- रुख्मिणी मंदिर (Shri Vitthal- Rukhmini Temple), पंढरपूर येथे यात्रा कालावधी दरम्यान तात्पुरत्या स्वरुपात उभा करण्यात येणारा दर्शनमंडप (Vitthal Darshan Mandap) आणि दर्शनरांग याकरीता कायमस्वरुपी उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने जिल्हा नियोजन समिती, सोलापूर यांनी येथील दि.16 जुलै 2024 रोजीच्या पत्रान्वये शासनास प्रस्ताव सादर केला होता. हा प्रस्तावास मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली.

त्यानुषंगाने श्री विठ्ठल- रुख्मिणी मंदिर (Shri Vitthal- Rukhmini Temple), पंढरपूर येथे कायमस्वरुपी दर्शनमंडप आणि दर्शनरांग करणेकरीता शासन निर्णय नुसार 129.49 कोटी रकमेच्या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता तर 13 कोटी इतका निधी वितरीत करण्यासही यात मान्यता देण्यात आलेली आहे.

प्रकल्पात नमुद अंदाजपत्रकातील कामाच्या बाबी व त्यांचे विवरण खालीलप्रमाणे आहे.

दर्शन मंडप – मुलभूत सुविधा व इलेक्ट्रिकल वर्क सहित 87 कोटी 31 लाख तर दर्शन रांग (स्कायवॉक) सर्व सुविधायुक्त व इलेक्ट्रिकल वर्क सहित 42 कोटी 18 लाख इतक्या निधीस प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली असून या कामाकरता 13 कोटीचा निधी सन 2024 25 या वर्षात वितरित करण्यास मान्यता मिळालेली आहे.

(हेही वाचा – Gondia junction : महाराष्ट्रातील महत्त्वाचे रेल्वे स्थानक)

जिल्हाधिकारी यांचा सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश-

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद (Collector Kumar Ashirwad) यांनी दर्शन मंडप व स्काय वॉकचा बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. तसेच पंढरपूर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दर्शनाची सुलभ व्यवस्था व्हावी यासाठी अत्यंत नियोजनबद्धरित्या हा आराखडा तयार केला. जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी हा आराखडा प्रथम पालकमंत्री चंद्रकांत पाटील पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समितीत मंजूर करून घेतला. त्यानंतर 17 ऑगस्ट 2024 रोजी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीत हा आराखडा प्राथमिक दृष्ट्या मंजूर झालेला होता, त्यानंतर 23 सप्टेंबर रोजी या समितीने या आराखड्यास मंजुरी दिली. व 24 सप्टेंबर 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी या आराखड्याला अंतिम मंजुरी दिलेली आहे. याबाबतचा शासन निर्णय दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी निघालेला आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मागील अनेक वर्षापासून प्रलंबित राहिलेला दर्शन मंडप व दर्शन रांगेचा प्रश्न आता लवकरच सुटणार असून यामुळे महाराष्ट्र राज्य सह देशभरातील विठ्ठल भक्तांना श्री विठ्ठलाचे दर्शन सहज व सुलभ होणार आहे.

हेही वाचा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.