Versova-Madh Bridge : वर्सोवा ते मढ दरम्यान केबल स्टे आधारित पूल, आता दीड तासांऐवजी केवळ २० मिनिटांमध्ये होणार प्रवास

1238
Versova-Madh Bridge : वर्सोवा ते मढ दरम्यान केबल स्टे आधारित पूल, आता दीड तासांऐवजी केवळ २० मिनिटांमध्ये होणार प्रवास
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

अंधेरी पश्चिम वर्सोवा ते मालाड पश्चिम मढ येथे जाण्यासाठी फेरीबोटने प्रवास करावा लागत असून रात्री बारा वाजता तसेच पावसाळ्यात या फेरीबोट सेवा बंद झाल्यानंतर रस्त्याने प्रवास करावा लागतो. यासाठी दीड तासांचा वेळ लागतो. त्यामुळे याठिकाणी पूल बांधण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून होत असून आता प्रत्यक्षात या पुलाच्या कामांसाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. हे पूल केबल स्टेवर आधारित असून या पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर रहिवाशांना अवघ्या २० मिनिटांमध्ये पोहोचता येणार आहे. (Versova-Madh Bridge)

मढ ते वर्सोवा हा प्रवास करण्यासाठी १८.६ किमी अंतर कापावे लागते किंवा वर्सोवा खाडीवरील फेरीबोटने प्रवास करावा लागतो. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार मढ जेट्टी ते वर्सोवा जेट्टी या दरम्यान वर्सोवा खाडीवर पुलाचे बांधकाम करण्याचा निर्णय घेतला आहे. या पुलाच्या बांधकामासाठी सन २०१२ मध्ये सल्लागाराची नेमणूक करण्यात आली होती. त्यामुळे तब्बल १२ वर्षांनंतर या पुलाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. स्थानिक मच्छिमार रहिवाशांच्या विरोधामुळे या पुलाचे काम आजवर रखडले होते. त्यानंतर २०१६ मध्ये देशाचे तत्कालिन संरक्षण मंत्र्यांनी तत्कालिन मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून याठिकाणी पूल बांधण्याची सूचना केली होती, त्यानंतरही या पुलाचे बांधकाम रखडले होते. या पुलाने नौदल खात्याच्या सुरक्षेत कोणतीही बाधा येत नसल्याचे कळवल्यानंतर या पुलाच्या बांधकामासाठी जून २०१९ मध्ये निविदा मागवली होती. (Versova-Madh Bridge)

(हेही वाचा – Railway Accident : गुजरातमध्ये रेल्वे घातपाताचा प्रयत्न उघडकीस)

या पुलाच्या बांधकामासाठी मागवलेल्या निविदेत ऍपको आरबीएल या संयुक्त भागीदारीतील कंपनीची निवड करण्यात आली आहे. या पुलाच्या बांधकामासाठी विविध करांसह ३ हजार २४६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. संकल्पना व बांधणी तत्वावर या पुलाची उभारणी केली जाणार असून यासाठी तांत्रिक सल्लागारावर सुमारे आठ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. (Versova-Madh Bridge)

महापालिकेच्या पूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, वर्सोवा खाडीवरील पुलाच्या बांधकामामुळे प्रवासाची लांबी १८.६ किमीवरून ५ किमीपर्यंत कमी होण्यास मदत होईल आणि प्रवासाचा वेळ १ तास ३० मिनिटांवरू २० मिनिटापर्यंत कमी होईल. यामुळे वाहन चालवण्याचा खर्च, वेळ आणि पर्यावरणाची हानी कमी करण्यास मदत होईल, असे म्हणतात. या प्रकल्पाचा एकूण कालावधी ४२ महिन्यांचा असेल, असे म्हटले आहे. या पुलाचे बांधकाम हे केबल स्टेवर आधारित आहे. या केबल स्टे पुलाची लांबी १५०, ३०० आणि १५० मीटर अशा तीन टप्प्यात असेल तर त्याची रुंदी २४.३० मीटर असेल. त्यामुळे या पुलाचा मार्ग मोकळा झाल्याने येत्या तीन ते चार वर्षांत येथील पुलाचे बांधकाम पूर्ण होऊन येथील नागरिकांची मोठी समस्या दूर होईल असा विश्वास व्यक्त केला. (Versova-Madh Bridge)

(हेही वाचा – NPS Vatsalya : एनपीएस वात्सल्य योजनेसाठी अर्ज कसा करायचा? काय आहेत फायदे?)

कसे होईल पुलाचे बांधकाम
  • मढ ते वर्सोवा पुलाची लांबी : २०६४ मीटर
  • केबल स्टे पूल मार्गांची लांबी : १५० मीटर अधिक ३०० मीटर अधिक १५० मीटर
  • केबल स्टे पूलाची रुंदी : २४.३० मीटर
  • उन्नत मार्ग, पूल : १४६५ मीटर लांब
  • उन्नम मार्ग पूल : वर्सोवा २३.३० रुंद, मढ १७.०० मीटर रुंद
  • पुलावरील वाहनांची गती : १०० कि.मी. प्रति तास
  • केबल्स स्टेवरील मार्गिका : प्रत्येकी दोन (एकूण चार मार्गिका)
  • पुलावरील मार्गिका : एकूण सहा मार्गिका, प्रत्येकी तीन
  • पदपथावरील तरतूद : केबल स्टे आणि पुलावर दीड मीटर (Versova-Madh Bridge)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.