PM Narendra Modi यांच्या पालघर दौऱ्यामुळे ठाणे वाहतूक व्यवस्थेत केले बदल; हे आहेत पर्यायी मार्ग 

86
PM Narendra Modi यांच्या पालघर दौऱ्यामुळे ठाणे वाहतूक व्यवस्थेत केले बदल; हे आहेत पर्यायी मार्ग 
PM Narendra Modi यांच्या पालघर दौऱ्यामुळे ठाणे वाहतूक व्यवस्थेत केले बदल; हे आहेत पर्यायी मार्ग 

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या शुक्रवार, ३० ऑगस्ट रोजी आयोजित पालघर जिल्हा (PM Narendra Modi Palghar Visit) दौऱ्यानिमित्त महत्त्वाच्या व्यक्ती मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून येण्याची शक्यता असल्याने या महामार्गावर वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी ठाणे शहर वाहतूक शाखेने (Thane City Traffic Branch) वाहतूक मार्गात बदल केल्याची माहिती पोलिस उपायुक्त पंकज शिरसाठ (DCP Pankaj Shirsath) यांनी गुरुवारी दिली. (PM Narendra Modi)

वाहतूक नियंत्रण शाखेने दिलेल्या माहितीनुसार, भिवंडीतील मुंबई-ठाणे-कळवा मुंब्राकडून नारपोलीतील कशेळीमार्गे गुजरातकडे जाणाऱ्या सर्व मोठ्या वाहनांना कशेळी येथे ‘प्रवेश बंद’ केला आहे. ही वाहने मुंबई नाशिक महामार्गाने माणकोली-भिवंडी-वडपेमार्गे नाशिक दिशेने सोडली जातील. नाशिककडून गुजरातकडे जाणाऱ्या सर्व मोठ्या वाहनांना वडपे नाका येथे ‘प्रवेश बंद’ राहणार आहे. त्याऐवजी ही वाहने वडपे नाका येथून यू-टर्न घेऊन मुंबई नाशिक महामार्गाने सोडण्यात येणार आहेत.

(हेही वाचा – Chhatrapati Shivaji Maharaj यांचा पुतळा कोसळल्याचे प्रकरण उच्च न्यायालयात)

मुंबईकडून घोडबंदरमार्गे तसेच नाशिक-मुंबई महामार्गावरून कॅडबरी ब्रिज खालून यू-टर्न घेऊन अहमदाबादकडे जाणाऱ्या मोठ्या वाहनांना माजिवडा ब्रिज ज्युपीटर वाय जंक्शन येथे प्रवेश बंद केला आहे. या मार्गावरून जाणारी वाहने ही माजिवडा ब्रीजवरून मुंबई-नाशिक महामार्गावरून पुढे सरळ वडपे नाकामार्गे नाशिक दिशेने जातील. मुंबईकडून घोडबंदरमार्गे तसेच कापुरबावडी सर्कल घोडबंदरमार्गे अहमदाबादकडे जाणाऱ्या वाहनांना कापुरबावडी सर्कल येथे प्रवेश बंद केला आहे. त्याऐवजी ही वाहने कापुरबावडी सर्कल येथून गोल्डन डाईज नाका येथून मुंबई नाशिक महामार्गाने वडपे नाकामार्गे नाशिक दिशेने भिवंडीकडून बाळकुम नाकामार्गे कापुरबावडी सर्कल येथून घोडबंदरमार्गे अहमदाबादकडे जाणाऱ्या वाहनांना कापूरबावडी सर्कल येथे ‘प्रवेश बंद’ केला आहे. ही वाहने ही कापुरबावडी सर्कल येथून गोल्डन डाईज नाका येथून सरळ मुंबई- नाशिक मार्गावरून वडपे नाकामार्गे नाशिक दिशेने सोडण्यात येणार आहेत.

या बदललेल्या वाहतूक मार्गामुळे वाहनांची कोंडी होणार नसली तरी वाहनचालकांना वेगळे वळसे घेऊन जावे लागणार आहे. त्यामुळे काहीसा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. (PM Narendra Modi)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.