Swaminarayan Mandir : अमेरिकेत हिंदू मंदिराची विटंबना; ‘हिंदूनो परत जा’ म्हणत द्वेषपूर्ण घोषणाबाजी!

कॅलिफोर्नियातील बीएपीएस श्री स्वामी नारायण मंदिराची तोडफोड

217
Swaminarayan Mandir : अमेरिकेत हिंदू मंदिराची विटंबना; 'हिंदूनो परत जा' म्हणत द्वेषपूर्ण घोषणाबाजी!
Swaminarayan Mandir : अमेरिकेत हिंदू मंदिराची विटंबना; 'हिंदूनो परत जा' म्हणत द्वेषपूर्ण घोषणाबाजी!

न्यू यॉर्क (new york) पाठोपाठ आता कॅलिफोर्नियातील बीएपीएस श्री स्वामी नारायण मंदिराची दि. २६ सप्टेंबर रोजी तोडफोड करण्यात आली आहे. याविरोधात निषेध नोंदवत ‘हिंदूंनो परत जा’ अशा हिंदूविरोधी घोषणाही देण्यात आल्या.

दरम्यान १० दिवसांपूर्वी न्यू यॉर्कमधील (new york) मेलव्हिल येथील स्वामीनारायण मंदिराची (Swaminarayan Mandir) विटंबना करण्यात आली होती. त्याठिकाणी द्वेषपूर्ण संदेशांसह मंदिर परिसरातील वस्तुंची तोडफोड करण्यात आली होती. यासंदर्भातील माहिती बीपीएस हिंदू संघटनेने (Hindu organization) एका निवेदनातून देण्यात आली. या निवेदनात बीपीएसने म्हटले आहे की, ” आमचा निषेध कायम राहिल. या घटनेमुळे आमचे दु: ख आणखीनच वाढले आहे. अंत:करणात द्वेष असणाऱ्यांसाठी आमच्या प्रार्थना अधिक दृढ झाल्या आहेत.” असेही बीपीएसने सांगितले आहे.

यूए हाऊसमध्ये सॅक्रामेंटा काऊंटीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अमी बेरी यांनी या घटनेचा जाहिरपणे निषेध करत लोकांना असहिष्णूतेविरोधात उभे राहण्याचे आवाहन केले आहे. अमी बेरी यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये सांगितले की, “#SacramentoCountry धार्मिक कट्टरतेला आणि द्वेषाला जागा नाही. त्यामुळे समाजात घडलेल्या या उघड कृत्याचा मी तीव्र निषेध करतो. आपण या असहिष्णूतेविरोधात उभे राहायला हवे. तसेच आपल्या समाजातील प्रत्येकाला सुरक्षित आणि सन्मानपूर्वक जीवन जगाता येईल याची खात्री केली पाहिजे.” असं त्यांनी लिहीले आहे.

(हेही वाचा : RBI Security : आरबीआयच्या सुरक्षेत निष्काळजीपणा, ११ पोलिस कॉन्स्टेबलसह कारकून निलंबित

तसेच हिंदू अमेरिकन फाऊंडेशनने सिनेट न्यायिक समितीला पत्र लिहून एफबीआय आणि कॅलिफोर्निया या दोन्ही राज्यांच्या डेटाचा हवाला देऊन हिंदूविरोधी द्वेषाचा इतिहास आणि हिंदू प्रार्थनास्थळ यावर तपशीलवार अहवाल दिला आहे.

 हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.