सुप्रीम कोर्टाच्या ८व्या महिला Judge Hima Kohli निवृत्त; सरन्यायाधीशांना म्हणाल्या, सर…

84
सुप्रीम कोर्टाच्या ८व्या महिला Judge Hima Kohli निवृत्त; सरन्यायाधीशांना म्हणाल्या, सर...
सुप्रीम कोर्टाच्या ८व्या महिला Judge Hima Kohli निवृत्त; सरन्यायाधीशांना म्हणाल्या, सर...

सर्वोच्च न्यायालयाच्या (8th Woman Judge of Supreme Court) ८व्या महिला न्यायाधीश न्यायमूर्ती हिमा कोहली (Hima Kohli) यांचा शुक्रवारी (३० ऑगस्ट) न्यायालयात शेवटचा कामकाजाचा दिवस होता. निरोप समारंभात त्यांनी सरन्यायाधीश चंद्रचूड (Chief Justice Chandrachud) यांना निवृत्तीनंतर त्यांच्या जागी महिला न्यायाधीशाची नियुक्ती करण्याची विनंती केली आहे. (Judge Hima Kohli)

CJI चंद्रचूड (Chief Justice Chandrachud) म्हणाले- वरिष्ठ वकिलांनी अधिकाधिक महिला वकिलांचे प्रशिक्षण आणि नियुक्ती करावी. विधी व्यवसायात समान संधी मिळाल्यावर न्यायमूर्ती कोहली यांच्यासारख्या अधिक महिला वकील बनतील.

न्यायमूर्ती कोहली तीन वर्षे सर्वोच्च न्यायालयात सेवा दिल्यानंतर १ सप्टेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. न्यायमूर्ती कोहली ४० वर्षे कायदेशीर व्यवसायात राहिल्या. त्यांनी २२ वर्षे वकील आणि १८ वर्षे न्यायाधीश म्हणून काम केले. ३१ ऑगस्ट २०२१ पासून त्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत होत्या.

(हेही वाचा – तुमच्या मनातील सावरकर द्वेष पुढे आला; भाजपाचा Uddhav Thackeray यांच्यावर पलटवार)

CJI म्हणाले- हिमा महिलांच्या हक्कांच्या मजबूत रक्षक आहे

न्यायमूर्ती कोहलींचे कौतुक करताना, CJI चंद्रचूड (Chief Justice Chandrachud) म्हणाले की, हिमा केवळ एक महिला न्यायाधीश नाही तर महिलांच्या हक्कांच्या मजबूत रक्षक देखील आहेत. न्यायमूर्ती कोहली यांच्यासोबत बसणे आनंदाची गोष्ट आहे. आम्ही खूप गंभीर विचारांवर बोललो आणि चर्चा केली. अनेक वेळा त्यांनी मला साथ दिली.

कोण आहेत न्यायमूर्ती हिमा कोहली?

न्यायमूर्ती हिमा कोहलींनी (Judge Hima Kohli ) १९८४ मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पस लॉ सेंटरमधून कायद्याचा अभ्यास पूर्ण केला. यानंतर त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) न्यायाधीश असलेल्या सुनंदा भंडारे, वायके सभरवाल आणि विजेंद्र जैन यांच्याकडून प्रशिक्षण घेतले. न्यायमूर्ती कोहली २००६ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश झाल्या.२००७ मध्ये कायम न्यायाधीश बनल्या. यानंतर, ७ जानेवारी २०२१ रोजी त्या तेलंगणा उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश झाल्या. CJI NV Ramana यांनी ३१ ऑगस्ट २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून तीन महिला न्यायाधीशांना पदाची शपथ दिली. त्यात न्यायमूर्ती कोहली, बीव्ही नागरथना आणि बेला एम त्रिवेदी यांचा समावेश होता.

हेही पाहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.