Kolkata doctor rape case प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून घेतली दखल

163

पश्चिम बंगालमधील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या (Kolkata doctor rape case) प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली न्यायमूर्ती जेबी पराडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी, 20 ऑगस्ट 2024 रोजी सुनावणी होणार आहे.

(हेही वाचा Mumbai – Nashik Highway वर वाहतूक कोंडी; नियम तोडणाऱ्या अवजड वाहनांवर कारवाईची गरज)

या घटनेच्या (Kolkata doctor rape case) निषेधार्थ देशभरातील डॉक्टर आणि वैद्यकीय महिविद्यालयांचे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. 17 ऑगस्ट रोजी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात स्युमोटो याचिका दाखल करून घेतली आहे. सरन्यायाधीशांना पाठवलेल्या या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेण्याची विनंती करण्यात आली होती. 9 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता आरजी कार हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह आढळला होता. यानंतर पोलीस दहाच्या सुमारास घटनास्थळी आले. पीडितेच्या अंगावर अनेक जखमांच्या खुणा होत्या. सुरुवातीला रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी याला आत्महत्या असल्याचे म्हटले होते, परंतु नंतर पोस्टमॉर्टम अहवालात बलात्कार करून हत्या केल्याचे समोर आले. यानंतर कोलकाता पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि आरोपी संजय राय याला अटक केली. पोलिसांच्या चौकशीत त्याने गुन्हा मान्य केला. पुढे हे प्रकरण कलकत्ता उच्च न्यायालयात पोहोचले. कोलकाता उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचे आदेश दिले. या प्रकरणी (Kolkata doctor rape case) सीबीआयने आतापर्यंत सुमारे 20 जणांची चौकशी केली आहे. सीबीआयच्या टीमने आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या आपत्कालीन वॉर्डमध्ये आणि बाहेर 3D लेझर मॅपिंगची तपासणी केली आहे. आता सर्वोच्च न्यायालयही यावर सुनावणी घेणार आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.