उत्तर प्रदेशात श्री गणेशमूर्तीवर Muslim धर्मांधांकडून दगडफेक

150
श्रीगणेशच्या मिरवणुकीवर मुसलमानांनी (Muslim) दगडफेक करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. उत्तर प्रदेशातही श्रीगणेश विसर्जन मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांनी दगडफेक केल्याची घटना समोर आली.
श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक कसौराटोरी या मुसलमानबहुल भागातून जात होती, तेव्हा धर्मांध मुसलमानांनी (Muslim) ही दगडफेक केली. १४ सप्‍टेंबर रोजी ही घटना घडली. ही मिरवणूक कसौराटोरी येथून जात असतांना मिरवणुकीत वाजवण्‍यात आलेल्‍या एका फाटाक्‍याची ठिणगी चुकून तेथीलच एका घरावर पडली. यानंतर हा वाद चालू झाला. धर्मांधांनी तात्‍काळ मिरवणुकीवर रिकाम्‍या बादल्‍या फेकून मारल्‍या आणि नंतर दगडफेक केली. यामुळे परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्‍काळ घटनास्‍थळी पोचले आणि त्‍यांनी अनेकांना कह्यात घेतले. यानंतर संतप्‍त झालेल्‍या हिंदुत्‍वनिष्‍ठांनी पोलीस ठाण्‍यालाच घेराव घातला आणि जोरदार घोषणाबाजी केली, तसेच आरोपींना तात्‍काळ अटक करण्‍याची मागणी केली. या प्रकरणी विश्‍व हिंदु परिषदेचे जिल्‍हाध्‍यक्ष मनोज शिवहरे म्‍हणाले, ‘श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीच्‍या वेळी गणेशभक्‍तांवर करण्‍यात आलेल्‍या दगडफेकीमुळे गणेशभक्‍तांमध्‍ये प्रचंड संताप आहे. पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करावी.’

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.