Bhiwandi मध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर मशिदीजवळ दगडफेक

283
Bhiwandi मध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर मशिदीजवळ दगडफेक
Bhiwandi मध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर मशिदीजवळ दगडफेक

भिवंडीच्या (Bhiwandi) वंजार पट्टी नाका परिसरात विसर्जनासाठी जाणाऱ्या गणपती मिरवणुकीवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. यामुळे घुंघटनगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने विसर्जनाची मिरवणूक जागीच थांबवली आहे.

दरम्यान कामवारी नदीकडे मिरवणूक जात असताना हिंदुस्थानी मशिदीजवळ रात्री 1 वाजता मूर्तीवर अचानक दगडफेक करण्यात आली. या घटनेमुळे परिस्थिती चिघळली असून परिसरातील वातावरण तणावपूर्ण झाले आहे. खबरदारी म्हणून पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. दगडफेकीत काही जण जखमी झाले आहेत.

(हेही वाचा – India Win Asian Champions Trophy : चीनवर १-० ने मात करत भारताने सलग दुसऱ्यांदा जिंकला आशियाई चॅम्पियन्स करंडक )

पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज

खबरदारी म्हणून पोलिसांनी हस्तक्षेप करीत लाठीचार्ज केला. रात्री 2.30 वाजेपर्यंत मिरवणूक पुढे नेलेली नाही. यानंतर भाजप आमदार महेश चौघुले यांनी गणपती मंडळाला भेट दिली. गणेश भक्ताने रस्त्यातच बसून जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. या वेळी काही जणांना जमावाकडून मारहाण झाल्याची घटना घडली.

काही जणांना घेतले ताब्यात

पोलिस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, तणाव अजून वाढल्याने जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. यामध्ये काही नागरीक जखमी असून जमावाकडून झालेल्या दगडफेकीत एक पोलिस सुद्धा जखमी झाला आहे. या घटने नंतर शहरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.