Bmc School महापालिका प्रशासनाचा इथेही कंजुषपणा : शाळांमध्ये मुलींना मिळत नाही सॅनिटरी नॅपकीन!

636
Bmc School महापालिका प्रशासनाचा इथेही कंजुषपणा : शाळांमध्ये मुलींना मिळत नाही सॅनिटरी नॅपकीन!
Bmc School महापालिका प्रशासनाचा इथेही कंजुषपणा : शाळांमध्ये मुलींना मिळत नाही सॅनिटरी नॅपकीन!
  • सचिन धानजी,मुंबई

मुंबई महापालिकेने आरोग्य आणि स्वच्छतेचा विचार करत महापालिकेच्या शाळांमध्ये इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून देण्यासाठी तसेच त्या नॅपकिन्सवर शास्त्रोक्त प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्यासाठी सॅनिटरी नॅपकीन वेंडींग मशिन आणि नॅपकीन बर्निंग मशिन बसवले. परंतु आज सर्व मशिन्स सुस्थितीत असतानाही या मशिनमध्ये सॅनिटरी नॅपकीन्सच नाही. अनेकदा या वेंडींग मशिनमधून सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून घेण्यासाठी मुली टोकत टाकतात, पण त्यात नॅपकीन नसल्याने टोकन वाया जाते. मागील तीन ते चार महिन्यांपासून हा प्रकार सुर असून महापालिका शिक्षण (Bmc School) विभागाचा याकडे जराही लक्ष नाही.,एका बाजुला कोट्यवधी रुपयांचे प्रस्ताव काही क्षणांत मंजूर केले जात असताना दुसरीकडे मुलींची गरज पूर्ण करण्यासाठी सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून देण्यास प्रशासन कंजुषपणा करत आहे, याबाबत तीव्र नाराजी पालकांकडून व्यक्त केली जात आहे.

WhatsApp Image 2024 10 15 at 8.56.43 AM

(हेही वाचा – Diwali Gift : कर्मचाऱ्यांना मर्सिडीज कार दिवाळी भेट देणारी ही कंपनी कुठली?)

महापालिका शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या इयत्ता ८वी, ९ वी आणि १०वीच्या विद्यार्थिनींपैकी ज्यांना मासिक पाळी सुरु झालेली आहे. अशा गरजू विद्यार्थिनींना महिन्यातील या विशिष्ट काळात शाळेत उपस्थित राहण्यास येणाऱ्या अडचणींवर मात करून उपस्थित राहण्यासाठी तसेच त्यांच्या आरोग्याच्या व स्वच्छतेबाबत सहकार्य करण्याच्या हेतून महापालिका प्रशासनाने प्रथम इयत्ता ९ वी व १०वीच्या विद्यार्थिंनीना सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेत १७२ सॅनिटरी नॅपकीन वेंडिंग मशिनची आणि १७२ सॅनिटर नॅपकीन बर्निंग मशिनचा खरेदी करत शालेय इमारतींमध्ये या मशिन्स बसवण्यात आल्या.

WhatsApp Image 2024 10 15 at 8.57.23 AM

यासर्व मशिनमध्ये यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यानंतर केवळ महिना ते दीड महिनाच सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध होऊ शकले. त्यानंतर मलींकडून वारंवार शिक्षकांना सुचना करूनही या सॅनिटरी नॅपकीनचा उपलब्ध करून दिले जात नाही अशाप्रकारची तक्रार मागील काही दिवसांमध्ये शालेय विद्यार्थिनी तसेच पालकांकडून केली जात आहे. मुलींच्या पालकांच्या म्हणण्यानुसार मासिक पाळीच्या वेळी शाळेतून मुलींना सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध होत असल्याने आम्हाला विकत घेण्याची गरज भासत नव्हती, परंतु शाळांमध्ये सध्या या नॅपकीन उपलब्ध नसल्याने मुली स्वत: बाजारातून विकत घेत आहे, शाळेतून मिळणाऱ्या नॅपकीनच्या तुलनेत बाजारात अधिक पैसे मोजावे लागत आहे.

(हेही वाचा – Pune Railway Station : फुकट्या प्रवाशांनो सावधान! पुणे रेल्वे स्थानकात तिकीट तपासणी मोहीमेला गती)

महापालिका शिक्षकांच्या (Bmc School) म्हणण्यानुसार, जुलै महिन्यापर्यंत आम्हाला सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध झाले आणि ते आम्ही मशिनद्वारे वितरीत केले. परंतु आता शाळेलाच सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध होत नसल्याने मशिनमध्ये टाकता येत नाही. त्यामुळे शाळांमध्ये असणाऱ्या वेंडींग मशिन या सॅनिटरी नॅपकीन विना रिकाम्या आहेत.

महापालिका शिक्षण (Bmc School) विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी नेमण्यात आलेल्या कंत्राटदाराचा कालावधी संपलेला आहे. परंतु कोविड काळात याचा वापर न झाल्याने कालावधी संपला असला तरी त्यांच्याकडून जेवढी मंजुरी दिली होती, तेवढ्या सॅनिटरी नॅपकीनचा वापर होऊ शकलेला. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांच्या मंजुरीने याच कंत्राटदाराकडून सॅनिटरी नॅपकीनचा पुरवठा करून घेत येणाऱ्या शैक्षणिक वर्षांसाठी नविन कंत्राटदाराची निवड केली जावी अशी सूचना केली आहे. त्यानुसार सॅनिटरी नॅपकीनचा पुरवठा बाबत आठ दिवसांमध्ये निर्णय होऊ प्रत्येक शाळांच्या विद्यार्थिनींच्या संख्येनुसार तसेच मागणीनुसार त्यांना सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून दिले जातील,असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.