ST Strike : संपात शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची पिलावळ, गुणरत्न सदावर्ते यांनी केली पोलखोल

164
ST Strike : संपात शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची पिलावळ, गुणरत्न सदावर्ते यांनी केली पोलखोल
ST Strike : संपात शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची पिलावळ, गुणरत्न सदावर्ते यांनी केली पोलखोल

ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. (ST Strike) त्यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्या नोकरदार वर्गाला मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागू शकते. या संपाविषयी अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ‘शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पिलावळीने हा संप पुकारला आहे’, अशी टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. मविआ सरकारच्या काळातच एसटी कर्मचाऱ्यांना सातवा आयोग मिळणार होता. मात्र टक्केवारीवर नजर ठेवत एसटी कर्मचारी संघटनेने हा वेतन आयोग लागू होऊ दिला नाही, असा गंभीर आरोपही गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी केला आहे.

(हेही वाचा – Mamata Banerjee: पश्चिम बंगालच्या विधानसभेत अपराजिता महिला-बाल सुरक्षा विधेयक सादर!)

गुणरत्न सदावर्ते या वेळी म्हणाले की, महाराष्ट्रात कुठेही बंद झालेला नाही, कारण नोटीस नाही. गिरीश देशमुख नावाचे अधिकारी उद्धव ठाकरेंचे आहेत, असा आम्हाला संशय आहे, त्यांची चौकशी झाली पाहिजे. सातवा वेतन आम्ही मिळवून राहणारच, तो आमचा हक्काचा आहे. सुप्रिया ताई तुम्हाला महाराष्ट्रातलं काहीच माहिती नाही. ह्या संघटनेतील लोकांनी कधीच महामंडळात व्यवस्थित नोकरी केली नाही. यांना करार पाहिजे, टक्केवारी पाहिजे, त्यामुळे कोणीही यांच्यावर विश्वास ठेवणार नाही. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासोबत एसटी कर्मचारी नाही. तसेच एसटी बँकेकडे पैसे आहेत, अडीच हजार कोटी रुपये आहेत आमच्याकडे, आम्ही यात मध्यस्थी करु शकतो आणि शासनाला पैसै देऊ शकतो, असा दावाही गुणरत्न सदावर्ते यांनी केला.

काही संघटना संपात सहभागी नाहीत

शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पिलावळांनी बंद (ST bus strike) करण्याचा प्रयत्न केला. ही सर्व लोकं रिटायर्ड हार्ट लोकं आहेत. ‘तुम लढो हम कपडे संभालेंगे’, अशी ही लोक आहेत. महाविकास आघाडीच्या लोकांनी थोतांड सुरु आहे. कोणत्याच परिस्थितीत कोणालाही टक्केवारी मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात सातवा वेतनाच्या आयोगाची घोषणा होणार होती. तशी चर्चा आमच्यासोबत झाली होती. मात्र, या संघटनांनी ‘करार करा’, असे सांगितले आणि यांनीच हे सर्व थांबवलं. आम्ही 65 हजार कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करतो, आमदार पडळकर, पावसकर यांच्या संघटना या संपात उतरल्या नाहीत, अशी माहिती गुणरत्न सदावर्ते यांनी दिली.

काय आहेत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या?

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे, प्रलंबित महागाई भत्ता आणि फरक, वाढीव घरभाडे भत्ता आणि फरक, वेतनवाढीच्या दराचा फरक, तसेच 4849 कोटी रुपयांमधील शिल्लक रकमेचे वाटप आणि नुकत्याच मुळ वेतनात जाहीर केलेल्या पाच हजार, चार हजार आणि अडीच हजार रुपयांऐवजी सरसकट 5000 रुपये हजार मिळावेत अशा मागण्या एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आल्या आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.