ST New Online Reservation: एसटीच्या नव्या ऑनलाईन आरक्षण प्रणालीला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद, कारण काय?

178
ST New Online Reservation: एसटीच्या नव्या ऑनलाईन आरक्षण प्रणालीला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद, कारण काय?

एसटीची नवी ऑनलाईन आरक्षण प्रणाली १ जानेवारी २०२४पासून अद्ययावत करण्यात आली. नव्याने सुरू करण्यात आलेल्या तिकीट आरक्षण प्रणालीला उदंड प्रतिसाद मिळाला असून १ जानेवारी २०२४ ते २० मे २०२४ पर्यंत १२ लाख ९२ हजार इतक्या तिकिटांची विक्री या नव्या ऑनलाईन आरक्षण प्रणालीच्या माध्यमातून झाली आहे. याच काळात मागील वर्षी ९ लाख ७५ हजार तिकीटांची विक्री झाली होती म्हणजेच मागील वर्षाच्या तुलनेत ही संख्या सुमारे ३ लाखाने जास्त आहे. सध्या या ऑनलाईन आरक्षण प्रणालीद्वारे दररोज १० हजार तिकीटे काढली जात आहेत. (ST New Online Reservation)

प्रवाशांना घरबसल्या एसटीचे तिकीट उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एसटीने आपल्या npublic.msrtcors.com अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन तिकीट आरक्षण करण्याची सोय केली आहे तसेच मोबाईल ( भ्रमणध्वनी) वर MSRTC Bus Reservation ॲपच्या माध्यमातूनदेखील प्रवाशांना तिकीट काढता येते. या दोन्ही पद्धतीद्वारे तिकीट काढण्याच्या प्रणालीमध्ये १ जानेवारी, २०२४ पासून अमुलाग्र बदल करून त्या अद्ययावत करण्यात आल्या. (ST New Online Reservation)

या प्रणालीतील अनेक दोषांचे निर्मूलन झाल्याने सदर ऑनलाईन आरक्षण प्रणाली प्रवाशांना वापरण्यास अत्यंत सोपी व सुलभ झाली आहे तसेच या दोन्ही प्रणालीद्वारे प्रवाशांना अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला सन्मान योजना, दिव्यांग व्यक्ती अशा विविध सवलतींचेदेखील आगाऊ आरक्षण मिळू शकते. त्यासाठी महामंडळाने npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळाबरोबरच MSRTC Bus Reservation ॲपचा वापर प्रवाशांनी करावा, असे आवाहन केले आहे.

(हेही वाचा – MIDC Plot Scam : उमेश पाटील यांचे रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप )

तांत्रिक अडचण आल्यास काय कराल?
ऑनलाईन आरक्षण करताना प्रवाशांना तांत्रिक अडचण आल्यास ७७३८०८७१०३ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. सदर नंबर प्रवाशांना तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी २४ तास सुरू असणार आहे तसेच ऑनलाईन आरक्षण करताना पैसे भरूनदेखील तिकिटे न येणे (पेमेंट गेट वे संदर्भात) या तक्रारींसाठी ०१२०-४४५६४५६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.