Sri Ganesh Gaurav Award Competition : अंधेरीतील स्वप्नाक्षय आणि करीरोडमधील पंचगंगा मंडळांचा यंदाही झेंडा

360
Sri Ganesh Gaurav Award Competition : अंधेरीतील स्वप्नाक्षय आणि करीरोडमधील पंचगंगा मंडळांचा यंदाही झेंडा
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘श्रीगणेश गौरव पुरस्कार-२०२४’ या स्पर्धेत सातबंगला, अंधेरी (पश्चिम) येथील स्वप्नाक्षय मित्र मंडळ आणि करीरोड येथील पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळाने अनुक्रमे पहिला आणि दुसरा क्रमांक मिळवत पुन्हा एकदा बाजी मारत या पुरस्कारावरील आपला हक्क कायम ठेवला आहे. मागील अनेक वर्षांपासून ही दोन्ही उत्सव मंडळे पहिल्या तीन क्रमांकांमध्ये येत असून यंदाही पहिला आणि दुसरा क्रमांक मिळवत मुंबईतील सर्वोकृष्ट गणेशोत्सव मंडळांमध्ये आपला झेंडा पुन्हा एकदा रोवला. तर मालाड येथील युवक उत्कर्ष मंडळाने तिसरा क्रमांक पटकावला आहे. या तिन्ही गणेशोत्सव मंडळांना अनुक्रमे ७५ हजार रुपये, ५० हजार रुपये आणि ३५ हजार रुपये तसेच सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. (Sri Ganesh Gaurav Award Competition)

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उप आयुक्त (परिमंडळ २) तथा गणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे यांच्या मार्गदर्शनात महानगरपालिकेच्या जनसंपर्क खात्याच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल शुक्रवारी १३ सप्टेंबर, २०२४ रोजी महानगरपालिका मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये उप आयुक्त (परिमंडळ २) तथा गणेशोत्सव समन्व्यक प्रशांत सपकाळे यांनी जाहीर करत या पुरस्कारांची घोषणा केली.

(हेही वाचा – Jitendra Awhad यांचे ‘ते’ विधान समाजात तणाव निर्माण करणारेच; उच्च न्यायालयाचे कनिष्ठ न्यायालयाला सुनावणी घेण्याचे आदेश)

मुंबई महानगरपालिकेद्वारे दरवर्षी श्रीगणेश गौरव पुरस्कार स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदा या स्पर्धेचे ३५ वे वर्ष असून या स्पर्धेत ५५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी भाग घेतला होता. प्राथमिक आणि अंतिम अशा दोन फेरींमध्ये ही स्पर्धा पार पडली. सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळाने देखाव्यासाठी निवडलेला विषय, पर्यावरणपूरक मूर्ती, विषयाची मांडणी, मंडळाने केलेली सामाजिक व विधायक कार्ये, परिसर स्वच्छता, मुंबई महानगरपालिकेच्या विविध मोहिमांमध्ये-कार्यांमध्ये नोंदविलेला सहभाग, पर्यावरण पूरकता, जनहित संदेशांचा वापर आदी बाबींचा या पुरस्कारासाठी विचार करण्यात आला. या पुरस्कारांसाठीची १० आणि ११ सप्टेंबर २०२४ रोजी प्राथमिक, तर १३ सप्टेंबर २०२४ रोजी अंतिम फेरीदरम्यान परीक्षक मंडळाने अंतिम फेरीतील सर्व १७ गणेशोत्सव मंडळांना भेटी देऊन अंतिम निकाल महानगरपालिकेच्या स्वाधीन केले. (Sri Ganesh Gaurav Award Competition)

सजावटीसाठी शिवाजीपार्क हाऊस सार्वजिनक गणेशोत्सव मंडळाची निवड

सर्वोत्कृष्ट नेपथ्यकाराचे पारितोषिक शिवाजी पार्क येथील शिवाजी पार्क हाऊस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सजावटीसाठी श्री. सुमित पाटील यांना जाहीर करण्यात आले आहे. याव्यतीरिक्त अवयवदान जागृतीसाठी गिरगावातील धसवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास, तर पर्यावरण विषयक जनजागृतीसाठी काळाचौकी परिसरातील रंगारी बंदक रहिवाशी संघ, सार्वजनिक उत्सव मंडळास आणि माझगांव येथील ताराबाग मंडळास देखील पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. याशिवाय, १० मंडळांना विशेष प्रशस्तिपत्रकेही जाहीर करण्यात आली आहेत.

(हेही वाचा – Shiv Sena UBT चा सुद्धा आरक्षण रद्द करण्याला पाठिंबा)

‘श्रीगणेश गौरव स्पर्धा – २०२४’ चा सविस्तर निकाल

प्रथम पारितोषिक (रु.७५,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र) स्वप्नाक्षय मित्र मंडळ, सातबंगला, अंधेरी (पश्चिम)

द्वितीय पारितोषिक (रु.५०,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र) पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ, बावला मस्जिद, करीरोड (पश्चिम)

तृतीय पारितोषिक (रु.३५,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र) युवक उत्कर्ष मंडळ, गेट नंबर ०६, मालवणी, मालाड (पश्चिम)

सर्वोत्कृष्ट मूर्तीकार (रु.२५,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र) पंकज मेस्त्री यांना साईविहार विकास मंडळ, भांडूप पश्चिम येथील मूर्तीसाठी

(हेही वाचा – Maharashtra Assembly Poll : विधानसभा निवडणूक दिवाळीपूर्वीच?)

सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार (सजावटकार) (रु.२०,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र) सुमित पाटील यांना शिवाजी पार्क हाऊस गणेश मंडळ, दादर (पश्चिम) येथील सजावटीसाठी

उत्तेजनार्थ दोन पारितोषिके : (प्रत्येकी रुपये १०,०००/-)

१) नवतरुण मित्र मंडळ, कोकणी पाडा, गावदेवी नगर, दहिसर (पूर्व), मुंबई – ४०० ०६८

२) बर्वेनगर व अखिल भटवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, घाटकोपर (पश्चिम), मुंबई – ४०० ०८४

प्लास्टिक बंदी/थर्माकोल बंदी/पर्यावरण विषयक जनजागृती उत्तेजनार्थ दोन पारितोषिके : (प्रत्येकी रुपये १०,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र)

रंगारी बदक चाळ रहिवाशी संघ, सार्वजनिक उत्सव मंडळ, काळाचौकी, मुंबई

ताराबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ताराबाग, माझगाव, मुंबई

शाडू मातीची सर्वोत्कृष्ट मूर्ती पारितोषिक (रु.२५,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र) श्री गणेश क्रीडा मंडळ, काजुवाडी, अंधेरी (पूर्व)

सामाजिक कार्य/समाज कार्य/अवयवदान जागृती : पारितोषिक (रु.१५,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र) धसवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ठाकूरद्वार, गिरगाव, मुंबई (Sri Ganesh Gaurav Award Competition)

(हेही वाचा – BMC : समुद्रात आता सोडले जाते प्रक्रिया केलेले शुद्ध पाणी, जलप्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेचे आणखी एक पाऊल)

प्रशस्तिपत्र प्राप्त गणेशोत्सव मंडळे

समाज प्रबोधन : १) विघ्नहर्ता रहिवाशी मित्र मंडळ, बोरिवली (पूर्व), २) शिवगर्जना तरूण मित्र मंडळ, अंधेरी (पूर्व), ३) साईदर्शन मित्र मंडळ, बोरिवली (पश्चिम)

शाडूची सुबक मूर्ती : श्री. श्रद्धा मित्रमंडळ, दहिसर पूर्व

सामाजिक जनजागृती : गोकुळगनर सार्वजनिक मंडळ, दहिसर पूर्व

पर्यावरण तसेच घनकचरा व्यवस्थापन जनजागृती : ज्ञानेश्वर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, दहिसर (पूर्व)

व्यसनमुक्ती प्रबोधन : अखिल भटवाडी सार्वजनिक उत्सव मंडळ, सिद्धीगणेश, घाटकोपर (पश्चिम)

मराठी भाषा प्रबोधन : हनुमान सेवा मंडळ, धारावी

रस्ते आणि अपघात जनजागृती : बालमित्र कला मंडळ, विक्रोळी (पश्चिम)

मतदानविषयक जनजागृती (लहान मुलांची सजावट) : इलेव्हन इविल्स क्रिकेट क्लब, धाराशिव मंदिर, धारावी (Sri Ganesh Gaurav Award Competition)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.