मध्यान्न भोजनात निघाला साप; शाळेतील २४ विद्यार्थी पडले आजारी

134
मध्यान्न भोजनात निघाला साप; शाळेतील २४ विद्यार्थी पडले आजारी
मध्यान्न भोजनात निघाला साप; शाळेतील २४ विद्यार्थी पडले आजारी

प्राथमिक शाळेच्या मध्यान्न भोजनात साप निघाल्यामुळे २४ विद्यार्थी आजारी पडल्याची घटना बिहारच्या अररिया जिल्ह्यातील फारबिसगंज येथे घडली. या विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या धक्कादायक घटनेनंतर अररियाचे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि अन्न व औषध पुरवठा अधिकारी रुग्णालयात दाखल झाले असून दोषींवर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

(हेही वाचा – मुंबईतील २२६ इमारती अतिधोकादायक)

यासंदर्भातील माहितीनुसार, बिहारच्या अररिया जिल्ह्यातील फारबिसगंज येथील अमौन प्राथमिक शाळेत मुलांना नेहमी प्रमाणे माध्यान्ह भोजन देण्यात येत होते. विद्यार्थी जेवण करत असताना एकाच्या ताटात चक्क मेलेला साप आढळून आला. त्यानंतर घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी या प्रकरणाची माहिती मुख्याध्यापकांना दिली. त्यातच काही विद्यार्थ्यांना अचानक उलट्या होण्यास सुरुवात झाली तर काही मुले भोवळ येवून खाली पडली. त्यानंतर मुख्याध्यापकांसह शिक्षकांनी आजारी विद्यार्थ्यांना उपचारासाठी तातडीने फारबिसगंज येथील रुग्णालयात दाखल केले. जेवणात साप निघाल्याने विद्यार्थी आजारी पडल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर फारबिसगंज येथील अनेक पालकांनी शाळा प्रशासनाविरोधात आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत संतप्त पालकांना शांत केले. त्यानंतर आता शाळा प्रशासनाने दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.