Dadar Shivaji Park : शिवाजी महाराज पार्कवर बसवणार स्मॉग टॉवर, सुशोभीकरणासाठी विशेष प्रकल्प घेणार हाती

छत्रपती शिवाजी पार्कमध्ये (शिवाजी पार्क) काही वर्षांपूर्वी अयोग्य पद्धतीने टाकलेल्या मातीमुळे परिसरातील नागरिकांना धुळीच्या मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

36
Dadar Shivaji Park : शिवाजी महाराज पार्कवर बसवणार स्मॉग टॉवर, सुशोभीकरणासाठी विशेष प्रकल्प घेणार हाती
Dadar Shivaji Park : शिवाजी महाराज पार्कवर बसवणार स्मॉग टॉवर, सुशोभीकरणासाठी विशेष प्रकल्प घेणार हाती

छत्रपती शिवाजी पार्कमध्ये (शिवाजी पार्क) काही वर्षांपूर्वी अयोग्य पद्धतीने टाकलेल्या मातीमुळे परिसरातील नागरिकांना धुळीच्या मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या परिसरातील वायू प्रदूषणाची समस्या सोडविण्यासाठी येथे स्मॉग टॉवर लावण्याची संकल्पना खासदार राहुल शेवाळे यांनी मांडली असून त्याला मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी प्राथमिक मंजुरी दिली आहे. यामुळे येथील हवेतील धुळीच्या प्रदूषणाची समस्या निकाली निघेल, असा विश्वास खासदार शेवाळे यांनी व्यक्त केला आहे. (Dadar Shivaji Park)

दादरच्या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्कचा (शिवाजी पार्क)लवकरच विशेष प्रकल्प हाती घेण्यात येणार असून या प्रकल्पासाठी शेवाळे यांनी  पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मंगळवारी सकाळी परिसराची पाहणी करून खासदारांनी त्यांना सूचना दिल्या. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात वास्तव्य करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सूचांनाचा अंतर्भावही या सुशोभीकरण प्रकल्पात केला जाणार आहे. खासदार शेवाळे यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांसह राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन याविषयी चर्चाही केली. यावेळी मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त रमाकांत बिरादार, सहाय्यक आयुक्त प्रशांत सकपाळे, मनसे नेते संदीप देशपांडे, माजी नगरसेवक संतोष धुरी आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (Dadar Shivaji Park)

शिवाजी महाराज पार्कचा कायापालट होणार असून या परिसरातील धुळीची समस्या मार्गी लावून पार्कला नवा लूक देण्यासाठी विशेष प्रकल्प लवकरच सुरू होणार असल्याची माहिती शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी दिली. मुंबईच्या सामाजिक आणि राजकीय जीवनात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या सुशोभीकरण प्रकल्पाला देखील लवकरच सुरुवात केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारतातील सगळ्यात उंच तिरंगा ध्वज, पार्कमधील वास्तूंचे नूतनीकरण, पार्क मधील आसनव्यवस्था सुधारणा, माहिमच्या एस टी पी प्रोजेक्ट मधील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पार्कमध्ये वापर या आणि अशा अनेक नव्या बाबींचा समावेश या सुशोभीकरण प्रकल्पात करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसराच्या सौंदर्यात आणखी भर पडेल, असा विश्वास खासदार शेवाळे यांनी व्यक्त केला आहे. (Dadar Shivaji Park)

(हेही वाचा – Apple Momento : दहा वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्याला ॲपल कंपनीने दिला अनोखा मोमेंटो)

सुशोभीकरण प्रकल्प कसा असेल
  • धुळीची समस्या सोडविण्यासाठी स्मॉग टॉवर्स उभारणार. (Dadar Shivaji Park)
  • पार्कमध्ये राज्य सरकारच्या वतीने दरवर्षी स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. त्यामुळे येथे देशातील सगळ्यात उंच तिरंगा ध्वज उभारला जाणार आहे. (Dadar Shivaji Park)
  • समर्थ व्यायाम मंदिर, स्काऊट गाईड हॉल अशा पार्क परिसरातील ऐतिहासिक वास्तूंचे हेरिटेज पद्धतीने नूतनीकरण. (Dadar Shivaji Park)
  • माहीम येथील एस टी पी प्लांट मधील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर पार्कमध्ये हिरवळ राखण्यासाठी केला जाणार. (Dadar Shivaji Park)
  • विद्युत रोषणाई. (Dadar Shivaji Park)
  • आसन व्यवस्था अद्ययावत करणार. (Dadar Shivaji Park)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.