हैदराबादमधील स्वप्नलोक कॉम्प्लेसक्समध्ये भीषण आग; ६ जणांचा आगीत होरपळून मृत्यू

31

हैदराबादमधील सिकंदराबादमध्ये गुरुवारी रात्री स्वप्नलोक कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्या सहा जणांमध्ये चार महिलांचा समावेश आहे. अग्निशमन दलाने सात जणांचे प्राण वाचवले आहेत.

हैदराबादचे जिल्हा दंडाधिकारी अमोय कुमार म्हणाले की, या आगीतील धुरामुळे श्वास गुदमरल्याने सहा जणांचा मृत्यू झाला आहे. हे मृत वारंगल, महबूबाबाद आणि खम्मम जिल्ह्याचे रहिवासी असून इमारतीतील काम करणाऱ्या कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान चार तासांच्या अथक परिश्रमानंतर अग्निशमन दलाने स्वप्नलोक कॉम्प्लेक्सच्या तिसऱ्या मजल्यावरून सुरू झालेली आग आटोक्यात आणली. ही आग आठव्या मजल्यापर्यंत पसरली होती. अद्याप धूर हटला नसल्यामुळे बचावकार्य सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १० गाड्या असून अद्यापही आग विझवण्याचे काम सुरू आहे.

या भीषण आगीमुळे आजूबाजूच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे पोलिसांनी आजूबाजूच्या इमारतीमधील राहणाऱ्या लोकांना बाहेर काढले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती दक्षिण विभागाचे अतिरिक्त डीसीपी सय्यद रफिक यांनी सांगितले.

(हेही वाचा – केंद्रीय मंत्र्यांचा अपघात; भरधाव ट्रकने कारला उडवले)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.