Sikkim Flash Flood : हवामान केंद्रात बिघाड झाल्याने सिक्कीममध्ये झाला हाहाकार 

21
Sikkim flash flood : हवामान केंद्रात बिघाड झाल्याने सिक्कीममध्ये झाला हाहाकार 
Sikkim flash flood : हवामान केंद्रात बिघाड झाल्याने सिक्कीममध्ये झाला हाहाकार 

सिक्कीममध्ये आलेल्या पुराने तिथे मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. अनेक अत्याधुनिक यंत्रणा असताना ही हानी आपण का टाळू शकलो नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यावर ज्या ठिकाणी पूर आला, त्या ठिकाणी बसवलेल्या हवामान केंद्रात बिघाड झाल्याने त्याच्याकडून माहिती मिळणे बंद झाल्याचे समोर आले आहे. (Sikkim flash flood)

(हेही वाचा – Israel -Palestine Conflict : हमासपुढे अल-कायदाचे क्रौर्य फिके; जो बायडेन यांचा कठोर घणाघात )

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) सिक्कीममधील हिमसरोवरात १६ सप्टेंबर २०२३ रोजी २ हवामान केंद्रे उभारली होती. जेणेकरून पाऊस आणि हिमसरोवरातील बर्फ वितळून येणाऱ्या पुराविषयी पूर्वसूचना मिळतील. एक दक्षिण ल्होनाक ग्लेशियल लेकजवळ होते, तर दुसरे शाको चो ग्लेशियल लेक जवळ आहे. ही दोन्ही स्थानके स्वयंचलित होती.तिथे दोन कॅमेरे असलेले सौरऊर्जेवर चालणारे हवामान नियंत्रक यंत्र बसवले होते. त्यामुळे हवामानातील बदलांची माहिती सातत्याने मिळत होती. मात्र सिक्कीममध्ये पूर येण्यापूर्वी काही दिवस एका स्थानकाचे काम बंद पडले होते. दोघेही सतत डेटा पाठवत होते. (Sikkim flash flood)

4 ऑक्टोबरच्या रात्री घडलेल्या आपत्तीच्या काही दिवस आधी, दक्षिण लोनाक ग्लेशियल लेकजवळील हवामान केंद्राने डेटा पाठवणे बंद केले होते. त्याच्याकडून एकही फोटो उपलब्ध नव्हता. तिथल्या हवामानाचीही माहिती मिळाली नाही. हे दोन्ही हिमतलाव अत्यंत धोकादायक असल्याचे एनडीएमएला माहीत होते. दोन्ही हिमतलाव  15 आणि 16 हजार फूट उंचीवर आहेत.

अशा धोकादायक हिमनद्यांजवळ आता पुन्हा हवामान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. एनडीएमएने सांगितले की, दुर्गम भाग, खराब हवामान आणि धोकादायक ठिकाण यामुळे तेथे मानवरहित हवामान केंद्र उभारण्यात आले. जेणेकरून तिथून माहिती मिळू शकेल. हे स्थानक खराब हवामान सहन करू शकणार की नाही, अशीही चिंता होती. कारण त्यांची देखभाल करण्यासाठी तिथे कोणीच नव्हते. NDMA ला दोन ऑटोमेटेड वेदर स्टेशन्स (AWS) बसवण्यासाठी योग्य जागा सापडली होती. मात्र त्यात ऐनवेळी बिघाड झाल्याने येणाऱ्या संभाव्य पुराविषयी पूर्वसूचना मिळू शकली नाही. त्यामुळे मोठ्या आपत्तीला सामोरे जावे लागले. या आपत्तीमुळे 37 लोक मरण पावले. त्यामध्ये 10 सैनिक होते. आतापर्यंत 78 जण बेपत्ता आहेत. या पुरामुळे एकूण 3709 लोक बेघर झाले आहेत. (Sikkim flash flood)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.