Shivrajyabhishek Din : रायगडावर छत्रपतींचा सोहळा; अवघ्या महाराष्ट्राकडून मानाचा मुजरा

118
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५१ वा शिवराज्याभिषेक दिन (Shivrajyabhishek Din) सोहळा मोठ्या दिमाखात रायगडावर साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते. यावेळी शिवराज्याभिषेक समिती रायगडचे अध्यक्ष सुनील पवार यांनी शिवरायांच्या चरणी हिंदू राष्ट्राचे गाऱ्हाणे (साकडं) घातले. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, रायगडचे खासदार सुनील तटकरे, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, मंत्री अदिती तटकरे, स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले, वीर बाजीप्रभू देशपांडे यांचे ११ वे वंशज तसेच आमदार महेंद्र थोरवे, आमदार संजय गायकवाड, आमदार अनिकेत तटकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
shivaji
पावसाच्या अखंड जलधारात शिवप्रेमी मोठ्या संख्येने या सोहळ्यास उपस्थित होते. सकाळी ९ वाजता मंत्रोच्चारात पालखीतून मिरवणुकीने राजसदरेवर आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला जलाभिषेक व सुवर्ण मुद्राभिषेक करण्यात आला.
shivaji2
नंतर शासकीय मानवंदना देण्यात आली. ढोल- ताशे, शिवप्रेमी पथकांचे विविध कार्यक्रम आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने किल्ले रायगड दुमदुमले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवप्रेमींना मार्गदर्शन करताना, युनेस्कोच्या जागतिक वारसामध्ये सातासमुद्रापार आपल्या १८ किल्ल्यांचा इतिहास गेला आहे.
shivaji1
गड किल्ल्यांच्या रक्षणाचे काम सरकार करेल. मी कमी बोलतो आणि काम अधिक करतो. तुमच्या मनात जे आहे, तेच माझे पण स्वप्न आहे, महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी निधी कमी पडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. (Shivrajyabhishek Din)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.