Ganeshotsav 2023 : तरुणांना साद घालणारी सेल्फी विथ गणपती बाप्पा स्पर्धा आणि पर्यावरण पुरक घरगुती श्री गणेश सजावट स्पर्धा

26
पर्यावरण जागृती आणि सजावट कलेला प्रोत्साहन देण्यासाठी व्यास क्रिएशन्स् आणि राज्ञी वुमन वेलफेअर असोसिएशन यांनी  पर्यावरण पुरक घरगुती श्री गणेश सजावट आणि सेल्फी विथ गणपती बाप्पा स्पर्धेचे आयोजन केले आहे.  प्रकाशन व्यवसायात स्वतःची नाममुद्रा उमटवणारी एक सुप्रसिद्ध प्रकाशन संस्था म्हणजे व्यास क्रिएशन्स्. महाराष्ट्र राज्यात घराघरात साजरा होणार्‍या गणेशोत्सवासाठी घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा आणि सेल्फी विथ गणपती बाप्पाचे आयोजन करण्याचे ठरवले आहे.
विजेत्या स्पर्धकांना व्यास क्रिएशन्स् आणि राज्ञी वुमन वेलफेअर असोसिएशनद्वारे पारितोषिक आणि ई-सन्मानपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात येईल. घरगुती श्रीगणेश सजावट स्पर्धा आणि सेल्फी विथ गणपती बाप्पा या स्पर्धेबाबतचा तपशील, नियम, अटी सोबत देत आहोत. तेव्हा महाराष्ट्रातील सर्व गणेशभक्त कलाकारांनी या स्पर्धेत अधिक संख्येने जरूर भाग घ्यावा, अशी विनंती, व्यास क्रिएशन्स्चे संचालक नीलेश वसंत गायकवाड आणि राज्ञी वुमन वेलफेअर असोसिएशनच्या सीईओ वैशाली गायकवाड यांनी केले आहे.
या स्पर्धेत फक्त महाराष्ट्रात राहणारा कोणीही स्पर्धक भाग घेऊ शकेल. ही गणेश सजावट स्पर्धा फक्त घरगुती गणपतींसाठीच असेल. या स्पर्धेत सार्वजनिक गणपतींचा समावेश नसेल. गणेश सजावट ही मुख्यत्वे पर्यावरण पुरक (इको फ्रेंडली) स्वरूपाची असावी. थर्माकोल अथवा प्लास्टिकचा वापर असलेली सजावट स्पर्धेतून बाद ठरवण्यात येईल. https://forms.gle/7tZzKQ2B2ktNNRod8 या लिंकवर जाऊन प्रत्येक स्पर्धकानी आपला गुगल अर्ज (Google form) भरणे बंधनकारक आहे.
गुगल फॉर्म च्या लिंकमधील दिलेल्या पोस्टरची प्रिंट काढून ठेवावी. आपल्या घरातील गणपती भोवती केलेल्या सजावटीमध्ये ते पोस्टर समाविष्ट करावे, (वेगवेगळ्या अँगलमधून काढलेले तीन फोटोज) गुगल फॉर्म लिंक मध्ये अपलोड करावेत.  त्याच गुगल फॉर्म मध्ये एक छोटासा एक ते दोन मिनिटांचा व्हिडिओदेखील अवश्य पाठवावा. यात व्हिडिओ मध्ये सजावटकाराचे, स्पर्धकाचे  मनोगत आम्हाला अपेक्षित आहे. सर्वात महत्वाचे स्पर्धकाने फक्त आपल्याच घरातील गणपतीच्या सजावटीचाच फोटो पाठवायचा आहे. दुसर्‍यांच्या घरातला नाही. ज्या स्पर्धकांना व्हिडिओ पाठवणे शक्य नसेल त्यांनी आपल्या सजावटीची वैशिष्ट्ये एका कागदावर 10 ते 15 ओळीत लिहून त्या कागदाचा फोटो काढून पाठवावा.
स्पर्धकाने फोटो पाठवताना त्यात आपले संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. विजेत्या स्पर्धकांना व्यास क्रिएशन्स्च्या निवड समितीद्वारे स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. अंतिम निर्णय हा निवड समितीचा असेल. विजेत्या स्पर्धकांच्या बाप्पांच्या सजावटीचे फोटो व्यास क्रिएशन्स्तर्फे प्रकाशित होणार्‍या या वर्षीच्या ‘प्रतिभा’च्या दिवाळी विशेषांकात नावासह प्रसिद्ध केले जातील.
सेल्फी विथ गणपती बाप्पा स्पर्धा नियम व अटी पुढीलप्रमाणे आहेत. या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कोणीही या स्पर्धेत भाग घेऊ शकतो. श्री गणेशाबरोबर आपला किंवा आपल्या कुटुंबाचा पारंपरिक वेषात सेल्फी अथवा फोटो काढून 8652233676 या क्रमांकावर पाठवावा. प्रत्येक स्पर्धकाने फक्त एकच फोटो पाठवावा. फोटो पाठवताना स्पर्धकाने आपले नाव, तालुका आणि जिल्हा लिहून त्या व्यवस्थित दिसेल अशा फोटो सोबत पाठवावे. पारितोषिक प्रदान समारंभ व्यास क्रिएशन्स्च्या दीपोत्सव-2023 मध्ये केला जाईल. याची विजेत्या स्पर्धकांना वैयक्तिकरित्या माहिती पुरवली जाईल. सेल्फी स्पर्धेचे फोटो  गुगल फॉर्म मध्ये पाठवू नयेत. अधिक माहितीसाठी आपण 9967637255 या क्रमांकावर संपर्क साधू शकता. स्पर्धेसाठी फोटो आणि व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2023 ही आहे. त्यानंतर येणार्‍या फोटोचा विचार स्पर्धेसाठी केला जाणार नाही.
ही  स्पर्धा  विनामूल्य आहे.  यासाठी  स्पर्धकांनी  कोणताही  आर्थिक  व्यवहार  करू  नये. तसा व्यवहार  केल्यास व्यास  क्रिएशन्स् जबाबदार राहणार नाही. सर्व सहभागी स्पर्धकांना ई-प्रमाणपत्र ऑनलाईन मिळेल. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल. स्पर्धेत भाग घेणार्‍यांना भरघोस बक्षिसे मिळणार आहेत, तर सर्व गणेश भक्तांनी या स्पर्धे सहभागी व्हावे असे आवाहन आयोजनांनी केले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.