श्रीमद्भगवत गीतेची ज्ञानेश्वरी ही भावार्थ दीपिका आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने जीवन जगण्याचे सूत्र समाजासमोर ठेवले. प्रत्येकाने ज्ञानेश्वरीतील किमान एक तरी ओवी अनुभवावी अन् जीवन समृद्ध करावे असे विचार संत साहित्याचे अभ्यासक, श्री सिद्धीविनायक मानव कल्याण मिशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे यांनी व्यक्त केले. (Sanjivan Samadhi Sohala)
(हेही वाचा – Panvel-Karjat उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरचे काम प्रगतिपथावर; ६७ टक्के काम पूर्ण )
श्री सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनतर्फे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यास अमृतधाम परिसरातील औदुंबर नगर येथील श्री दत्त मंदिराच्या प्रांगणात दि. २५ ते २८ नोव्हेंबर २०२४ दरम्यान आयोजीत सोहळ्याचा समारोप झाला. तपोवन येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे स्वामी जयरामगिरी महाराज, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, सरचिटणीस नाना शिलेदार, माजी नगरसेवक रुची कुंभारकर, प्राचार्य शिवाजी सानप, औदुंबर नगर मित्र मंडळाचे अध्यक्ष रमेश वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती. (Sanjivan Samadhi Sohala)
(हेही वाचा – Ring Road Pune : पुण्यातील रिंगरोड भूसंपादनासाठी डिसेंबरची ‘डेडलाइन’)
पुढे महाराज म्हणाले की, संत ज्ञानेश्वर महाराजानी जिवंत घेतलेली समाधी असल्याने तिला संजीवन म्हटले जाते. साक्षात पांडुरंग परमात्मा, सर्व देवता, साधू, संत या समाधी सोहळ्याला उपस्थित होत्या. जगाच्या पाठीवर समाजाने अतिशय त्रास देऊनही केवळ त्यांच्या कल्याणासाठी संत ज्ञानेश्वर यांनी कार्य केले आहे. भक्ताची, उत्कंठा शिगेला पोहोचली की, भगवान येत असतात. श्री क्षेत्र आळंदी येथे १०८ संत महात्म्यांच्या समाधी आहेत. १०९ वी समाधी ही संत ज्ञानेश्वर महाराजांची आहे. त्यामुळे या क्षेत्राला अनन्य साधारण महत्व असल्याचे डॉ. गुट्टे महाराज यांनी सांगितले. (Sanjivan Samadhi Sohala)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community