Mhada : संजीव जयस्वाल यांनी स्वीकारला म्हाडा उपाध्यक्षपदाचा कार्यभार

जयस्‍वाल यांनी आतापर्यंत महत्‍त्‍वपूर्ण अशा विविध पदांवर काम केले आहे. यामध्‍ये प्रामुख्‍याने सहाय्यक जिल्‍हाधिकारी म्‍हणून नाशिक आणि तळोजा येथे काम केले आहे.

162
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी  पदी नियुक्ती झाल्यानंतर या पदाचा कार्यभार  संजीव जयस्वाल यांनी सोमवारी, ५ जून २०२३ रोजी अनिल डिग्गीकर यांच्याकडून  स्वीकारला.
जयस्वाल हे भारतीय प्रशासन सेवेतील (आय.ए.एस.) १९९६ च्या तुकडीतील  अधिकारी आहेत. महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या प्रधान सचिवपदी कार्यरत असणाऱ्या जयस्वाल यांची म्हाडा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
जयस्‍वाल यांनी आतापर्यंत महत्‍त्‍वपूर्ण अशा विविध पदांवर काम केले आहे. यामध्‍ये प्रामुख्‍याने सहाय्यक जिल्‍हाधिकारी म्‍हणून नाशिक आणि तळोजा (जि.नंदुरबार) येथे काम केले आहे. त्‍यानंतर नाशिक जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी, उप मुख्‍यमंत्री यांच्‍या कार्यालयात उप सचिव, चंद्रपूर आणि औरंगाबादचे जिल्‍हाधिकारी, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्‍त, औरंगाबादचे विभागीय आयुक्‍त, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्‍त, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केले आहे. जयस्‍वाल यांनी कोविड काळात कोविड सेंटर उभारणी आणि कोविड सेंटर मध्ये बाधित रुग्णांच्या संपर्कातील रुग्णांची काळजी घेतल्या जाणाऱ्या कोविड केअर सेंटरच्या व्यवस्थापनाचे जबाबदारी लिलया पार पाडली होती.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.