Sameer Wankhede : समीर वानखेडे यांना अटकेपासून संरक्षण देण्याचा निर्णय कायम; पुढील सुनावणी ८ जून रोजी

समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी २०१७ ते २०२१ दरम्यान सहा परदेशी दौरे केले आहेत. यामध्ये यूके, आयर्लंड, पोर्तुगाल, दक्षिण आफ्रिका आणि मालदीव या देशांचा समावेश आहे समावेश आहे.

18
Sameer Wankhede : समीर वानखेडे यांना अटकेपासून संरक्षण देण्याचा निर्णय कायम; पुढील सुनावणी ८ जून रोजी

बहुचर्चित कॉर्डिलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणात (Sameer Wankhede) अडकलेल्या शाहरुख खानच्या मुलगा आर्यन खानला सोडवण्यासाठी २५ कोटींची लाच मागितल्याचा आरोप एनसीबी विभाग मुंबईचे माजी प्रादेशिक अधिकारी समीर वानखेडेंवर (Sameer Wankhede) करण्यात आला आहे. याच प्रकरणी शनिवारी, २० ते २२ मे या दिवशी सीबीआयकडून चौकशी करण्यात आली. समीर वानखेडे यांना चौकशीदरम्यान अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असतांनाच समीर वानखेडे यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

येत्या ८ जूनपर्यंत समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना अटक करता येणार नसल्याचे आदेश हायकोर्टाने सीबीआयला दिले आहेत. तसेच येत्या ३ जूनपर्यंत सीबीआयकडे अहवाल सादर करण्याचे आदेश समीर वानखेडे यांना आदेश देण्यात आले आहेत. सादर केलेल्या अहवालावर पुढील सुनावणी ८ जून रोजी होणार आहे. तोपर्यंत समीर वानखेडे यांना दिलासा मिळाला आहे.

(हेही वाचा – Demonetisation : ओखळपत्राविना 2 हजारच्या नोटा बदलू नये; दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल)

समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी २०१७ ते २०२१ दरम्यान सहा परदेशी दौरे केले आहेत. यामध्ये यूके, आयर्लंड, पोर्तुगाल, दक्षिण आफ्रिका आणि मालदीव या देशांचा समावेश आहे समावेश आहे. या परदेश दौऱ्यांसाठी समीर वानखेडे यांनी ८.७५ लाखांचा खर्च दाखवला आहे, जो वास्तविक खर्चापेक्षा खूपच कमी आहे. लंडनच्या १९ दिवसांच्या सहलीसाठी, वानखेडेने यांनी एक लाखांचाच खर्च दाखवला होता. एवढंच नाही तर वानखेडे यांचे मुंबईत चार फ्लॅट असल्याचा दावाही दक्षता अहवालात करण्यात आल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला आहे आहे. तसंच, मुंबईत त्यांच्या नावे सहा मालमत्ता असून ते वडिलोपार्जित मालमत्ता आहेत, असंही अहवालातून स्पष्ट झालं आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.