RTE प्रवेश आणखी लांबणीवर; आता पुढील सुनावणी जुलै महिन्यात 

162
RTE नुसार पुढील शैक्षणिक वर्षासाठी मुंबईतील २५ टक्के आरक्षित जागांसाठी ४७३५ विद्यार्थ्यांची निवड

मागील अनेक दिवसानपसून आरटीई (RTE) प्रवेश प्रक्रिया न्यायालयीन दरबारात अडकली आहेत. मंगळवार १८ जून रोजी मुंबई हायकोर्टात (Bombay High Court) झालेल्या सुनावणीत कोर्टाने ही सुनावणी ११ जुलैपर्यंत पुढे ढकलली आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीत पुण्यातील एक आणि मुंबईतील २ शिक्षण संस्थांनी न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली. त्यामुळे सुनावणी लांबली. कोर्टाने या हस्तक्षेप याचिका दाखल करून घेत त्यांना १० दिवसांची मुदत दिली आहे. त्यानंतर अंतिम सुनावणी ११ जुलै २०२४ रोजी घेणार असल्याचं कोर्टानं सांगितलं. (RTE)

(हेही वाचा – IAS अधिकारी Tukaram Mundhe यांची पुन्हा बदली; ‘या’ खात्याचा पदभार स्वीकारण्याचे आदेश!)

आरटीई (Right To Informetion) २५ टक्के आरक्षणाच्या संदर्भात ९ फेब्रुवारी २०२४ रोजी महाराष्ट्र सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने एक अधिसूचना काढून RTE प्रवेश प्रक्रियेत बदल केला होता. या बदलानुसार आरटीई प्रवेशात १ किलोमीटर परिसरात शासकीय आणि अनुदानित शाळेतच प्राधान्याने विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार होता. त्यात खासगी विनाअनुदानित शाळांना वगळण्यात आलं होते. मात्र या बदलला अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभा व मूव्हमेंट फॉर पीस जस्टीस फॉर सोशल वेल्फेअर यांनी विरोध करत मुंबई हायकोर्टात जनहित याचिका व रिट दाखल केली होती. त्यावर हायकोर्टाने सरकारच्या निर्णयाला स्थगिती देत पुन्हा प्रवेश प्रक्रिया पूर्ववत केली होती. मात्र कल्याण सिटीझन्स एज्युकेशन सोसायटी, मुंबई, असोसिएशन ऑफ इंडियन स्कूल्स, मुंबई व श्री चाणक्य एज्युकेशन सोसायटी, पिंपरी चिंचवड यांनी हस्तक्षेप याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली.  (RTE)

(हेही वाचा – “एक हात मदतीचा चॅरिटेबल ट्रस्ट”तर्फे Veer Savarkar यांना अनोखी मानवंदना !)

लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

आरटीई प्रवेशासाठी शिक्षण विभागाकडून ऑनलाइन प्रक्रिया राबवण्यात आली. त्यात ४ जूनपर्यंत अर्ज भरण्याची मुदत दिली होती. राज्यातील ९ हजार २१७ शाळांमध्ये १ लाख ५ हजार ३९९ जागांसाठी २ लाख ४२ हजार ९७२ अर्ज आले आहेत. ७ जूनला आरटीईची सोडत काढण्यात आली. परंतु न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने पात्र विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली नाही. १० जूनपासून बहुतांश शाळा सुरू झाल्या आहेत. परंतु अद्याप आरटीई प्रवेशावर अवलंबून असलेल्या पालकांचं लक्ष १८ जूनच्या कोर्टाच्या सुनावणीकडे लागलं होतं. मात्र आता पुढील २० दिवस ही सुनावणी पुढे गेल्याने पालकांची चिंता वाढली असून लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. (RTE)

हेही वाचा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.