समृद्धी महामार्गावरून रात्रीचा प्रवास धोकादायक! कुठे दगडफेक, तर कुठे लूटमार

96

समृद्धी महामार्गावरून रात्रीच्या वेळी धावणाऱ्या वाहनांवर तुफान दगडफेक छत्रपती संभाजीनगर परिसरात करण्यात आल्याची घटना घडली आहे. याच समृद्धी महामार्गवर लुटमारीची घटना सुद्धा घडली असून आता या मार्गावरून रात्रीचा प्रवास करणे धोकादायक ठरू लागले आहे.

( हेही वाचा : H3N2 इनफ्लूएंझावर औषधे नाहीत, काळजी घ्या! आरोग्यमंत्र्यांचे आवाहन)

रात्रीचा प्रवास करताना काळजी घेणे गरजेचे

दगडफेक, लुटमारीच्या लागोपाठ घडलेल्या घटनांमुळे रात्रीचा प्रवास करणाऱ्या वाहनधारकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार प्रशांत ठोकळ हे १४ मार्चला समृद्धीवरून रात्रीचा प्रवास करत असताना एका टोळक्याने त्यांची गाडी अडवून त्यांना मारहाण केली तसेच बंदूक आणि तलवारीचा धाक दाखवून त्यांच्या दोन सोन्याच्या अंगठ्या आणि रोख ६५ हजार रुपये असा ऐवज लुटला. या घटनेनंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या महामार्गावर सतत होणारे अपघात चिंतेचा विषय ठरत असतानाच आता लुटमार आणि दगडफेकीच्या घटनांमुळे नागरिकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे रात्रीचा प्रवास करताना काळजी घेणे गरजेचे आहे. महामार्गावर बचाव पथक आणि महामार्ग पोलिसांच्या नंबरचे फलक लावण्यात आले असून अडचणीत वाहनधारक यांची मदत घेऊ शकतात. तसेच ११२ क्रमांक डायल करून सुद्धा तुम्ही मदत मागू शकता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.