म्हाडाच्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत कपात; Atul Save यांची माहिती

ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि अर्ज स्वीकृतीसाठी १९ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

142
म्हाडाच्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत कपात; Atul Save यांची माहिती
  • प्रतिनिधी

विकास नियंत्रण नियमावली अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून म्हाडाच्या मुंबई मंडळाला प्राप्त झालेल्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत सुमारे १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात करण्यात येत असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी बुधवारी (२८ ऑगस्ट) दिली. मुंबई मंडळ सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि अर्ज स्वीकृती प्रक्रियेला १९ सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

आधुनिक तंत्रज्ञान युगामध्ये म्हाडाच्या केंद्रस्थानी असलेल्या नागरिकांशी जनसंवाद प्रामुख्याने सुलभ आणि पारदर्शक राहावा, या उद्देशाने म्हाडातर्फे निर्माण करण्यात आलेल्या शुभंकर चिन्हाचे अनावरण अतुल सावे (Atul Save) यांच्या हस्ते बुधवारी म्हाडा मुख्यालयात करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली.

(हेही वाचा – Sardar Patel Engineering College: मुंबईतील प्राध्यापकाला विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन भोवलं; कारवाई करत, पगारवाढ रोखली)

नवीन आणि मागील सोडतीतील या सदनिका पुनर्विकास प्रकल्पातून म्हाडाला गृहसाठा म्हणून प्राप्त झाल्या आहेत. यातील अत्यल्प उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती २५ टक्क्यांनी, अल्प उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती २० टक्क्यांनी, मध्यम उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती १५ टक्क्यांनी आणि उच्च उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती १० टक्क्यांनी कमी करण्यात आल्याचे सावे (Atul Save) म्हणाले.

यावेळी म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य अभियंता-२ धीरजकुमार पंदिरकर, मुख्य अभियंता-३ शिवकुमार आडे, सहमुख्य अधिकारी वंदना सूर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे, मुख्य वास्तुशास्त्रज्ञ आणि नियोजनकार पी. डी. साळुंखे, सहमुख्य अधिकारी उमेश वाघ, कोंकण मंडळाचे मुख्य अधिकारी अनिल अंकलगी आदी उपस्थित होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.