Central Railway : परळ, विक्रोळी,कांजूरमार्ग स्थानकाचे काम प्रगतीपथावर

परळ स्थानकांवरून मोठ्या प्रमाणात रुग्ण प्रवासी ये- जा करत असल्याने त्यांच्या सोईसाठी पहिल्या टप्यातच परळ स्थानकाचा पुर्नविकासचे काम रेल्वेने हाती घेतले असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.

22
Central Railway : परळ, विक्रोळी,कांजूरमार्ग स्थानकाचे काम प्रगतीपथावर
Central Railway : परळ, विक्रोळी,कांजूरमार्ग स्थानकाचे काम प्रगतीपथावर

अमृत भारत स्थानक’ योजनेंतर्गत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील १५ स्थानकांचे विकास काम रेल्वेने हाती घेतले आहे. यापैकी परळ, विक्रोळी, कांजूरमार्ग आणि भायखळा रेल्वे स्थानकांचे पुर्निविकास काम सुरु झाले आहे. विशेष म्हणजे परळ स्थानकांवरून मोठ्या प्रमाणात रुग्ण प्रवासी ये- जा करत असल्याने त्यांच्या सोईसाठी पहिल्या टप्यातच परळ स्थानकाचा पुर्नविकासचे काम रेल्वेने हाती घेतले असल्याची माहिती मध्य रेल्वेने (Central Railway) दिली. (Amrut Bharat Sthanak Yojana)

मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थापनांपैकी परळ स्थानक आहे. हे स्थानक टाटा कॅन्सर हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल, वाडिया हॉस्पिटल असून मोठ्या प्रमाणात रुग्ण आणि नागरिक या स्थानकावर प्रवास करतात. दररोज साधारण ४० हजार प्रवासी या स्थानकावरून ये – जा करतात. परळ वैद्यकीय शिक्षणाचे मुंबईतील एक महत्वपूर्ण केंद्र आहे. त्यामुळे रुग्ण प्रवाशांच्या सोईसाठी अमृत भारत योजनेअंतर्गत पहिल्या टप्यातच परळ स्थानकाचा पुर्नविकासचे काम रेल्वेने हाती घेतले आहे. या स्थानकाच्या पुर्नविकासासाठी अंदाजी १९.४१ कोटी रुपये खर्च येणार आहे. डिसेंबर २०२३ पर्यत ह्या स्थानकाचे पुर्नविकास करण्याचे नियोजन मध्य रेल्वेने केले आहे. त्यादिशेने रेल्वेकडून युद्धपातळीवर काम सुरु केले आहे.

(हेही वाचा : RPF : रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी दिल्लीत अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन)

असा होणार विकास
  • फलाटांवर लिफ्ट, सरकते जिने
  • सिवेज ट्रीटमेंट प्लांटच्या सुविधेसोबत नवीन शौचालय
  • सर्क्युलेटिंग एरिया आणि ट्रॅफिक प्लॅन सुधारणे
  •  स्टेशनच्या दर्शनी भागात सुधारणा
  •  स्थानकांवर प्रकाश व्यवस्था सुधारणे
  •  नवे आधुनिक दिशादर्शक फलक
  • अद्ययावत सार्वजनिक उद्घोषणा यंत्रणा
  •  बुकिंग ऑफिस आणि अन्य कार्यालयाचे नूतनीकरण
  •  दिव्यांग प्रवाशांसाठी सुविधा

‘या १५ स्थानकांचा समावेश

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय रेल्वेने विमातळाच्या धर्तीवर ‘अमृत भारत स्थानक’ योजना सुरू केली आहे. सध्या, या योजनेत देशभरातील एक हजार २७५ रेल्वे स्थानकांचे पुर्नविकास करण्यात येणार आहे, यामध्ये मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील स्टॅंडर्ड रोड, चिंचपोकळी,भायखळा, परळ, माटुंगा, वडाळा रोड, कुर्ला, विद्याविहार, विक्रोळी, कांजूरमार्ग, मुब्रा, दिवा, इगतपुरी, शहाड आणि टिटवाळा स्थानकाचा पुर्नविकास करण्यात येणार आहे. यापैकी परळ, विक्रोळी, कांजूरमार्ग आणि भायखळा रेल्वे स्थानकांचे पुर्निविकास काम सुरु झाले आहे. हे काम लवकरता लवकर पूर्ण करण्याचे नियोजन मध्य रेल्वेने ठेवले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.