Cyclone Fengal : फेंगल चक्रीवादळामुळे पळणार थंडी! ‘या’ भागांत रेड अलर्ट जारी

109
Cyclone Fengal : फेंगल चक्रीवादळामुळे पळणार थंडी! 'या' भागांत रेड अलर्ट जारी
Cyclone Fengal : फेंगल चक्रीवादळामुळे पळणार थंडी! 'या' भागांत रेड अलर्ट जारी

बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे रुपांतर फेंगल (Cyclone Fengal) या चक्रीवादळात झाले आहे. तसेच आज (३० नोव्हेंबर) हे चक्रीवादळ जमिनीकडे सरकण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यंदाच्या मान्सूननंतर बंगालच्या उपसागरात निर्माण होणारे हे दुसरे चक्रीवादळ आहे. दरम्यान या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आवश्यक अशी सर्व खबरदारी घेतली जात आहे. (Cyclone Fengal)

हेही वाचा- Cheetah Corridor: तीन राज्यांना मिळून बनणार देशातील सर्वात मोठा चित्ता कॉरिडॉर!

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेत तामिळनाडू (Tamil Nadu) सरकारने चेन्नई, तिरुवल्लूर, कांचीपुरम आणि चेंगलपट्टू जिल्ह्यातील सर्व शाळा आणि कॉलेज ३० नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. फेंगल चक्रि‍वादळाच्या पार्श्वभूमीवर ही तयारी करण्यात आली आहे. हे चक्रीवादळ आज दुपारपर्यंत ९० किलोमिटर प्रति तास वेगाने जमिनीवर धडकण्याची शक्यता आहे. (Cyclone Fengal)

हेही वाचा- Mumbai Local Mega Block : रविवारी मेगा ब्लॉक! कुठे, कधी, कसा? जाणून घ्या …

फेंगल हे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात तीव्र होत असून पुद्दुचेरी (Puducherry) जवळच्या भूभागाकडे सरकत आहे. यामुळे तामिळनाडूच्या प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तसेच सुरक्षा उपाय देखील लागू केले जात आहेत. भूभागाकडे येत असलेल्या वादळामुळे मुसळधार पाऊस आणि वारे वाहण्याची शक्यता आहे, त्यामुळे राज्य सरकारने अनेक जिल्ह्यांतील शाळा आणि महाविद्यालये बंद केली आहेत. याबरोबरच राज्यात अनेक ठिकाणी सार्वजनिक वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. तर आयटी कंपन्यांनी कर्मचार्‍यांसाठी वर्क फ्रॉम होम सुरू करण्याची विनंती केली आहे. (Cyclone Fengal)

‘या’ भागांत रेड अलर्ट जारी
‘आयएमडी’ने तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि रायलसीमा या भागांना शनिवारी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. चक्रीवादळाच्या अवशेषांचा प्रभाव तीन डिसेंबरपर्यंत कर्नाटक आणि केरळवर राहण्याची शक्यता आहे. या काळात महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये ढगाळ हवामान राहण्याची शक्यता असून, त्यामुळे किमान तापमानात वाढ होऊ शकते, असे ‘आयएमडी’चे म्हणणे आहे. (Cyclone Fengal)

चक्रि‍वादळाला फेंगल नाव का दिले?
या चक्रि‍वादळाला फेंगल हे नाव सौदी अरेबिया या देशाने दिले आहे. ‘फेंगल’ हे नावदेखील अरबी भाषेतील आहे. डब्लूएमओने ठरवून दिलेल्या नियमांप्रमाणे या पॅनलमधील प्रत्येक देश चक्रीवादळासाठी नावे सुचवतात. ज्यांचा वापर त्या भागात तयार होणाऱ्या प्रत्येक नवीन वादळाला क्रमाने देण्यासाठी केला जातो. एखाद्या उष्णकटिबंधीय चक्रीवादळासाठी एखादे नाव वापरल्यास ते या यादीतून काढून टाकले जाते. भविष्यातील वादळासाठी पुन्हा ते नाव वापरले जात नाही. नवी दिल्लीतील रीजनल स्पेशलाइज्ड मेटिऑलॉजिकल सेंटर (RSMC) सह अशाच जगभरातील इतर केंद्राद्वारे वापरल्या जाणाऱ्या नावाचा आधी वापर झाला नसल्याची खात्री केल्यानंतर अस्सल आणि वेगळी नावे निवडली जातात. (Cyclone Fengal)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.