Ratan Tata : रतन टाटांचं एक अनोखं पोर्ट्रेट, ज्यात जडले आहेत हिरे

Ratan Tata : सुरतमधील एका व्यापाऱ्याने हे पोर्ट्रेट स्वत: तयार केलं आहे.

171
Ratan Tata : रतन टाटांचं एक अनोखं पोर्ट्रेट, ज्यात जडले आहेत हिरे
  • ऋजुता लुकतुके

टाटा समुहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata) यांचं बुधवारी मध्यरात्री मुंबईत निधन झालं. देशभरातून रतन टाटांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते सर्वसामान्य भारतीयांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या आठवणी जागवत शोक व्यक्त केला. त्यातच गुजरातमधील एका हिरे व्यापाऱ्याने रतन टाटांचं एक पोर्ट्रेट बनवलं आहे. आणि ते ही १,१०० हिरे वापरून.

(हेही वाचा – Assembly Election : ‘आपले मतदान केंद्र जाणून घ्या’ उपक्रमाचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून कौतुक)

सूरतमधील एका व्यापाऱ्याने रतन टाटा (Ratan Tata) यांचे पोट्रेट चित्र साकारले आहे, विशेष म्हणजे टाटांचे हे चित्र चक्क हिऱ्यांनी साकारण्यात आलं आहे. सोशल मीडियावर सध्या हे पोट्रेट बनवतानाचा संबंधित व्यापाऱ्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्यापाऱ्याच्या कलाकृतीचं कौतूक होत असून बारकाईने रतन टाटांचे चित्र साकारले आहे. विशेष म्हणजे ११०० अमेरिकन डायमंडचा वापर करुन हे पोट्रेट बनवण्यात आलंय. सध्या हे पोट्रेट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत असून या कलाकाराचे व व्यापाऱ्याचे नेटीझन्सकडून कौतुक केलं जातंय.

(हेही वाचा – Baba Siddique Murder Case : शुभु लोणकरच्या भावाला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी)

रतन टाटा (Ratan Tata) यांच्या निधनानंतर त्यांचे सावत्र बंधू नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे, ते रतन टाटा यांचे उत्तराधिकारी ठरले आहेत. टाटा ट्रस्टच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. टाटा ट्रस्टचं अध्यक्षपद हे मोठं आहे, तेवढीच त्या पदाची मोठी जबाबदारी आहे. टाटा हे नाव एक ब्रँड आहे आणि हाच ब्रँड आणखी मोठा करण्यासाठी नोएल टाटा प्रयत्नशील असतील. दरम्यान, नोएल टाटा हे अनेक अर्थांनी या पदासाठी पात्र आणि सामर्थ्यशाली चेहरा आहेत. त्यांनी टाटा समूहात आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या नेतृत्त्वात टाटा हे नाव आणखी मोठं होण्यास मदत झालेली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.