Ramgiri Maharaj यांचे ‘सर तन से जुदा’ करण्याचा ‘स्टेटस’ ठेवणारा डॉ. महंमद साद याला अटक

372
अहिल्यानगर येथील महंत रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) यांचे छायाचित्र आणि त्याखाली ‘सर तन से जुदा’ असे लिखाण असलेला भ्रमणभाषचा ‘स्टेटस’ ठेवणार्‍या पालघर येथील धर्मांध डॉ. महंमद साद याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी नालासोपारा येथील राजेश पाल यांनी तक्रार प्रविष्ट केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता.
त्याने महंत रामगिरी महाराज यांच्या तोंडावर फाळे लावलेले छायाचित्र ठेवले होते. ‘मूत्र पिणे आणि शेण खाणार्‍यांनी आमच्या हुजूरविषयी बोलणार्‍या ‘सर तन से जुदा’ ही एकच शिक्षा आहे’, अशा आशयाचे लिखाण केले आहे. महाराज यांच्या छायाचित्राखाली ‘#ARRESTRAMGIRI’ असे लिहिले आहे.
अलीकडेच नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील शहा पांचाळे गावात एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) यांनी प्रेषित मोहम्मद आणि इस्लाम यांच्याबद्दल टिप्पणी केली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील पोलिसांनी महंत रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल केला. मुंब्रा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 302 (धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने शब्द उच्चारणे) आणि धार्मिक भावना भडकावणे, लैंगिक अत्याचार यासह इतर अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे गटांमधील शत्रुत्व वाढवणे, शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान करणे आणि गुन्हेगारी धमकी देणे समाविष्ट आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.