‘बटेंगे तो कटेंगे’ योगींचा संदेश महाराष्ट्रालाही लागू; महंत Ramgiri Maharaj यांचा हिंदूंना सावधानतेचा इशारा

138
'बटेंगे तो कटेंगे' योगींचा संदेश महाराष्ट्रालाही लागू; महंत Ramgiri Maharaj यांचा हिंदूंना सावधानतेचा इशारा
'बटेंगे तो कटेंगे' योगींचा संदेश महाराष्ट्रालाही लागू; महंत Ramgiri Maharaj यांचा हिंदूंना सावधानतेचा इशारा

आता झोपी गेलेला हिंदू समाज पुन्हा जागा झाला पाहिजे. कारण जगाने आदर्श घ्यावा अशी आपली सनातन हिंदू संस्कृती आहे. हिंदूंनी जातीभेद नाहीसा करत सनातन हिंदू धर्मासाठी एकत्र आले पाहिजे. कारण योगी आदित्यनाथ यांचा ‘बटेंगे ते कटेंगे’ हा संदेश महाराष्ट्रालाही लागू होतो, असे विधान महंत रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) यांनी केले. ‘श्रीशिवशंभू विचार मंच’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

राममंदिरासाठी देशातच ५०० वर्षांचा संघर्ष

पुढे ते म्हणाले, आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला पाहिजे. मुळात औरंगजेबाच्या अत्याचारांना नष्ट करण्यासाठी शिवरायांचा जन्म झाला. ज्यामुळे औरंग्याचे लाखोंचे सैन्यही शिवरायांना रोखू शकले नाही. पण आता हजारो वर्षे इस्लामी शक्तींनी आपल्या देशाला लुटले तरीही आपण काही शिकलो नसलो, तर ते आपले दुर्देव. त्यात आपल्याच राममंदिरासाठी आपल्यालाच देशात ५०० वर्षे संघर्ष करावा लागतो, असेही रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) म्हणाले.

श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित ‘श्रीशिवशंभू विचार मंच’ने दि. ४ नोव्हेंबर रोजी महंत रामगिरी महाराज यांच्या ‘शिवरायांच्या आदर्शांवर चालणारा सजग हिंदू समाज : काळाची गरज’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन दादरच्या राजा शिवाजी विद्यालयाच्या संकुलात करण्यात आले होते.

यावेळी शिवशंभू विचार मंचचे महाराष्ट्र राज्य संयोजक सुधीर थोरात आणि महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद आणि व्होट जिहाद याविषयावर आधारित जनजागृती करणाऱ्या चित्रफितीचेही महंत रामगिरी महाराजांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित तीन ग्रंथ रामगिरी महाराजांना ‘श्रीशिवशंभू विचार मंच’च्या महाराष्ट्र राज्य संयोजक सुधीर थोरात यांना दिले. तसेच ‘सांस्कृतिक भारत’ या त्रैमासिकाच्या दिवाळी अंकाचे प्रकाशनही रामगिरी महाराजांच्या (Ramgiri Maharaj) हस्ते करण्यात आले.

इस्लामिक शक्तींच्या विरोधात उभे रहा!

यावेळी महाराष्ट्र राज्य संयोजक सुधीर थोरात म्हणाले की, एक काळ असा होता की छत्रपती शिवाजी महाराजांमुळे इस्लामी आक्रमणे थांबली. हिंदू स्त्रियांवरील अत्याचार थांबले. परंतु पुढे ब्रिटीशांनी याचं शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर जाण्यास भारतीयांना बंदी केली. तसेच खोटा इतिहास देशात पेरला. ज्यामुळे आम्ही भारतीय महाराजांचा इतिहास विसरून गेलो. पुढे याचं ब्रिटीशांनी विभाजनवादी शक्तींना पाठबळ देत १९४७ ला देशाचं विभाजन घडवून आणलं. तसेच आताही या विभाजनवादी शक्ती सक्रीय झाल्या आहेत. त्यामुळे विभाजनवादी शक्तींपासून हिंदूंनी सावध राहणे ही काळाची गरज आहे. अठरापगड जातींनी एकत्र येत इस्लामी शक्तींच्या विरोधात उभे राहणे महत्त्वाचे आहे, असेही थोरात म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.