Marathwada Rain: मराठवाड्यात पावसाने हाहाःकार; जालन्यात अतिवृष्टीमुळे गावांचा संपर्क तुटला

84
Marathwada Rain: मराठवाड्यात पावसाने हाहाःकार; जालन्यात अतिवृष्टीमुळे गावांचा संपर्क तुटला
Marathwada Rain: मराठवाड्यात पावसाने हाहाःकार; जालन्यात अतिवृष्टीमुळे गावांचा संपर्क तुटला

मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी आणि हिंगोलीत (Hingoli Rain) शनिवारी मध्यरात्रीपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. जोरदार पावसामुळे (Heavy Rain) जायकवाडी धरण (Jayakwadi dam) जवळपास भरले आहे. नागरिकांनी गोदावरी नदीच्या पात्रात जाऊ नये, असेही आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात पहाटेपासून कुठे जोरदार त कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे . पावसाचा जोर प्रचंड असल्याने पाचोड खुर्द आणि पाचोड या दोन गावांचा संपर्क तुटला आहे. या गावांमध्ये नदी दुथडी भरुन वाहत आहे. (Marathwada Rain)

(हेही वाचा – रेल्वेमंत्र्यांनी दाखवले Vande Bharat Sleeper ट्रेनचे मॉडेल; विमानासारखी सुविधा, तिकीट राजधानीइतके…)

जायकवाडी धरणात 87 टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा जमा झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु असल्याने पाण्याची आवक वाढू शकते, असा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील जवळपास 100 गावांना पाटबंधारे विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पेठ बीड व जुना बीडकडे जाणारी वाहतूक बंद

बीडमधील बिंदुसरा नदीला पूर आल्याने पेठ बीड व जुना बीड कडे जाणाऱ्या दगडी पुलावरून पाणी गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. कालच बिंदुसरा नदीकाठच्या सर्वच गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

जालना जिल्ह्यात शेत आणि रस्ते जलमय

जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यामध्ये रविवारी दुपारनंतर ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. तालुक्यातील सर्वच गाव पावसानं झोडपून काढले आहे. पावसामुळे पांगरी , पाटोदा, सांगवी गावासह 5-6 गावामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. संपर्क तुटल्यामुळे गावातील 200 ते 250 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. (Marathwada Rain)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.