Pantry Car मधील खाद्यपदार्थांसाठी रेल्वेचे विशेष अभियान

92
Pantry Car मधील खाद्यपदार्थांसाठी रेल्वेचे विशेष अभियान

लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांना पँट्री कारमधून (Pantry Car) खाद्यपदार्थ, जेवण तयार करून दिले जाते. या खाद्यपदार्थांची गुणवत्ता चांगली की वाईट, स्वच्छतेचे पालन केले जाते का, याची तपासणी करण्यासाठी रेल्वेद्वारे विशेष अभियान राबवण्यात येत आहे. याअंतर्गत लांब पल्ल्याच्या विविध रेल्वे गाड्यांमध्ये रेल्वे अधिकाऱ्यांकडून पँट्री कारची तपासणी करण्यात येत आहे.

(हेही वाचा – Apple Job Cuts : ॲपलच्या सेवा विभागात शेकडो लोकांची गच्छंती?)

प्रवाशांना गुणवत्तापूर्ण, चवदार, ताजे खाद्यपदार्थ, शुद्ध पाणी दिले जाते की नाही. तसेच पँट्री कारच्या (Pantry Car) स्वच्छतेकडे लक्ष दिले जाते की नाही याची तपासणी केली जात असून, समरसता, मुंबई-हावडा व इतर रेल्वे गाड्यांमधील पँट्री कारची तपासणी करण्यात आली. प्रवाशांसाठी शिजवल्या जाणाऱ्या खाद्य पदार्थांसाठी कोणत्या ठिकाणचे पाणी वापरले जाते. ते वापरण्यास योग्य आहे का, तयार खाद्यपदार्थ कशाप्रकारे ठेवले जातात, त्यांचे पॅकिंग व्यवस्थित केले जाते की नाही, कशाप्रकारे खाद्यपदार्थ तयार केले जातात, ते ताजे असतात की नाही, याचा तपास रेल्वे अधिकाऱ्यांद्वारे करण्यात आला.

(हेही वाचा – Dhoni-Jadeja Viral Pic : धोनी आणि जाडेजाची जोडी शेतात नेमकं काय करत होती?)

या वेळी पँट्री कारमध्ये ज्या उणिवा आढळल्या त्या तत्काळ दूर करून खाद्यपदार्थ तयार करण्याचे निर्देश पँट्री कारच्या (Pantry Car) व्यवस्थापकांना देण्यात आले. सोबतच त्यांना चांगलेच खडसावून तत्काळ सुधारणा करण्याची सूचना रेल्वे अधिकाऱ्यांद्वारे करण्यात आली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.