Respiratory Diseases : श्वसन विकाराच्या तक्रारीत प्रामुख्याने वाढ

91
Respiratory Diseases : श्वसन विकाराच्या तक्रारीत प्रामुख्याने वाढ

यंदा पावसाचा जोर सुरू असल्याने हवेतील ओलसरपणा वाढला आहे. हा ओलसरपणा अनेक वेळा घरांमध्येही आढळून येतो. यामुळे श्वसन विकाराच्या (Respiratory Diseases) तक्रारी सध्या वाढल्या आहेत. दमा असलेल्या रुग्णांना प्रामुख्याने त्रास वाढलेला दिसून येत आहे. याचबरोबर ॲलर्जीच्या तक्रारीही वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्यतज्ज्ञांनी काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

(हेही वाचा – PM Narendra Modi यांच्या हस्ते शुक्रवारी वाढवण बंदर प्रकल्पाचे भूमिपूजन)

यंदा पाऊस जास्त पडत असल्याने हवेतील ओलसरपणा वाढला आहे. त्याचाच परिणाम होऊन घरांतील हवाही ओलसर होते. त्यातून या हवेत काही बुरशीजन्य आणि ॲलर्जी निर्माण करणारे घटक निर्माण होतात. दम्यासह इतर श्वसन विकार (Respiratory Diseases) असलेल्या रुग्णांना यामुळे त्रास सुरू होतो. याचबरोबर श्वसन विकार नसलेल्या रुग्णांनाही दीर्घकाळ या हवेत राहिल्यास त्रास उद्भवतो. यात प्रामुख्याने नाक वाहणे, सतत शिंका आणि त्वचेवर खाज सुटणे अशी लक्षणे दिसून येतात.

(हेही वाचा – राज्यसभेत भाजपाप्रणीत NDA पोहोचली बहुमताच्या जवळ)

दमा असलेल्या रुग्णांना हा गंभीर स्वरूपाचा त्रास सुरू होऊन त्यांना डॉक्टरांकडून उपचार घेण्याची वेळ येत आहे. याबाबत ससून रुग्णालयातील श्वसन विकार विभागाचे प्रमुख डॉ. संजय गायकवाड म्हणाले की, अनेक घरांच्या छतावरून पावसाचे पाणी वाहून न गेल्याने भिंती ओलसर होतात. या भिंतीवर बुरशी निर्माण होते. ही बुरशी ॲलर्जी निर्माण करणारे असतात. प्रामुख्याने दम्याचा विकार असलेल्या रुग्णांना त्रास वाढतो. त्यामुळे इतर ऋतुंच्या तुलनेत त्याला औषधे घेण्याची आवश्यकता निर्माण होते. श्वसनास त्रास अथवा चालताना धाप लागल्यास रुग्णांनी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. योग्य औषधोपचारामुळे रुग्णांची या त्रासापासून मुक्तता होते. (Respiratory Diseases)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.