Pune Helicopter Crash : पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; धुक्यामुळे घडली दुर्घटना

108
Pune Helicopter Crash : पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; धुक्यामुळे घडली दुर्घटना
Pune Helicopter Crash : पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; धुक्यामुळे घडली दुर्घटना

पु्ण्यात पुन्हा एकदा हेलिकॉप्टरच्या अपघाताची घटना समोर आली आहे. पुण्याच्या बावधन बुद्रुक परिसरात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हिंजवडी पोलिसांच्या कंट्रोल रुमला या घटनेची माहिती मिळाली. एका रिसॉर्टवरच्या हेलिपॅडवरुन उड्डाण केलेल्या हेलिकॉप्टरला हा अपघात झाला. (Pune Helicopter Crash)

(हेही वाचा – Pune Bulldozar Action : पिंपरी-चिंचवड महापालिकेने अवैध मशीद आणि मदरसा यांवर चालवला बुलडोझर)

पुण्याच्या बावधन बुद्रुक परिसरातील ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टवरच्या हेलिपॅडवरुन उड्डाण केलेल्या हेलिकॉप्टरचा अपघात होऊन तिघांचा मृत्यू झाला. धुक्यामुळे समोरचा डोंगराळ भाग न दिसल्याने ही दुर्घटना घडली. हे हेलिकॉप्टर पुण्यातून मुंबईतील जुहूच्या दिशेने येत होते. ते ट्वीन इंजिन ऑगस्टा आस्थापनाचे होते.

या हेलिकॉप्टरमधील २ पायलट आणि एका अभियंत्याचा मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टरमध्ये काही बिघाड झाला होता का, याचे आता अन्वेषण केले जात आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

गेल्या महिन्यातच पुणे जिल्ह्यातील पौड गावाजवळ खासगी कंपनीचे हेलिकॉप्टर कोसळून दुर्घटना घडली होती. सदर हेलिकॉप्टर मुंबईहू हैदराबादच्या दिशेला जात होते. मात्र खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याचे सांगितले जाते. सुदैवाने या घटनेत कोणी गंभीर जखमी झाले नाही. (Pune Helicopter Crash)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.