Pune Glass Factory : पुण्यातील येवलेवाडीमध्ये काचेच्या कारखान्यात भीषण अपघात; 4 कामगारांचा जागीच मृत्यू 

105
Pune Glass Factory : पुण्यातील येवलेवाडीमध्ये काचेच्या कारखान्यात भीषण अपघात; 4 कामगारांचा जागीच मृत्यू 
Pune Glass Factory : पुण्यातील येवलेवाडीमध्ये काचेच्या कारखान्यात भीषण अपघात; 4 कामगारांचा जागीच मृत्यू 

पुण्यातून एक गंभीर बातमी समोर आली आहे. पुणे येवलेवाडी (Pune Yevlewadi) भागात काचेच्या कारखान्यात भीषण दुर्घटना घडली असून, या घटनेत जागीच चार मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. तर दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. त्यासोबतच चार कामगार किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. (Pune Glass Factory)

पुण्याच्या येवलेवाडी येथील इंडिया ग्लास (India Glass Factory, Pune) या काचेच्या कंपनीत ही दुर्घटना घडली. दुपारी दीडच्या सुमारास काचेचा माल उतरवत असताना काचा फुटल्या. काचेच्या पेटीखाली काही कामगार अडकले असल्याची माहिती येथील कोंढवा भागातील अग्निशामक दलाला मिळाली होती. त्यानुसार अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी दाखल होताच अग्निशामक दलाच्या जवानांनी बचावकार्य सुरू केले. यावेळी सहा कामगार काचेच्या पेटीखाली दबले गेले होते. यातील सर्व कामगारांना बाहेर काढले. मात्र यातील चार जण गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. (Pune Glass Factory)

(हेही वाचा – Hassan Nasrallah च्या हत्येवर मेहबूबा मुफ्तींचे मगरीचे अश्रू; निवडणूक रणनीती की दु:ख?)

येथील कारखान्यात काम करणारे पवन रामचंद्र कुमार (40), धर्मेंद्र सत्यपाल कुमार (40), विकास प्रसाद गौतम (23), अमित शिवशंकर कुमार (27) या चार कामगारांचा मृत्यू झाला. हे सर्व कामगार उत्तर प्रदेसग येथील रहिवाशी होते. तसेच मानेसर कोळी (31) आणि जगतपाल संतराम कुमार (41) हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.