Pune Accident : माझा पुतण्या पळून गेला नाही; अपघातानंतर आमदार Dilip Mohite Patil यांचा खुलासा

Pune Accident : पुणे-नाशिक महामार्गावर शनिवार, २२ जून रोजी झालेल्या या अपघातामध्ये दुचाकीस्वार 19 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सदर प्रकरणामध्ये भरधाव वेगातील कारने दुचाकीला जोरदार धडक दिली.

180
Pune Accident : माझा पुतण्या पळून गेला नाही; अपघातानंतर आमदार Dilip Mohite Patil यांचा खुलासा
Pune Accident : माझा पुतण्या पळून गेला नाही; अपघातानंतर आमदार Dilip Mohite Patil यांचा खुलासा

पुणे-नाशिक महामार्गावर (Pune Nashik Highway Accident) कळंब येथे मयुर मोहिते यांच्या गाडीच्या अपघाताच्या प्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. मयुर मोहिते हा राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite-Patil) यांचा पुतण्या आहे. पुण्यातील बिल्डर विशाल अगरवाल यांच्या अल्पवयीन मुलाने पोर्शे कार बेदरकार चालवत केलेल्या अपघातानंतर पुन्हा पुणे जिल्ह्यातच ही घटना घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

(हेही वाचा – Ahmedabad Viral Video : घृणास्पद कृत्य! मेलेल्या कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं, व्हिडीओ व्हायरल)

पुण्यातील खेड तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील म्हणाले की, “अपघातानंतर माझा पुतण्या मयूर साहेबराव मोहिते हा कुठं ही पळून गेला नाही. शिवाय त्यानं मद्यपानही केलेलं नव्हतं.”

पुणे-नाशिक महामार्गावर शनिवार, २२ जून रोजी झालेल्या या अपघातामध्ये दुचाकीस्वार 19 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सदर प्रकरणामध्ये भरधाव वेगातील कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. या अपघातात मरण पावलेल्या 19 वर्षीय युवकाचे नाव ओम भालेराव आहे.

पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

मयुर मोहिते हा त्याच्या फॉर्च्युनर कारने नारायणगाववरून मंचरच्या दिशेने जात होता. या अपघातात मरण पावलेला 19 वर्षीय ओम भालेराव हा मंचरकडून कळंबच्या दिशेने चालला होता. ओम हा मुळचा कळंबचा असल्याने त्याच्या मृत्यूची बातमी कळताच गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पोलीस स्टेशनजवळ गर्दी केली. ओमच्या गावचे नागरिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातानंतर मृत व्यक्ती 5 ते 10 फूट दूर फेकली गेली. या ठिकाणी आता सीसीटीव्ही उपलब्ध आहे का, याची पोलीस चाचपणी करत आहे.

दुचाकीस्वाराच्या अपघाती मृत्युनंतर त्याच्या नातेवाईकांची पोलीस स्टेशनला धाव घेतली. दुचाकीस्वार तरुणाच्या मृत्युस कारणीभुत ठरलेल्या मयुर मोहितेविरुद्ध मंचर पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.