लाडकी बहीण योजनेसाठी अर्थसंकल्पात ४५ हजार कोटींची तरतूद; DCM Ajit Pawar यांची माहिती

89
लाडकी बहीण योजनेसाठी अर्थसंकल्पात ४५ हजार कोटींची तरतूद; DCM Ajit Pawar यांची माहिती

राज्याचा साडे सहा लाख कोटी रुपयांचा अर्थ संकल्प आपण मांडतो. यातून महिलांना सबळ, सक्षम बनविण्यासाठी आपण लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पातून ४५ हजार कोटी रुपये महिलांच्या योजनेसाठी बाजूला ठेवणं हे सहज शक्य आहे आणि आपण महायुती सरकारने ते केलं आहे असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने काढण्यात आलेल्या जन सन्मान यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात लाडकी बहीण संवाद मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

(हेही वाचा – Maharashtra Assembly Elections 2024: विधानसभेचं बिगुल वाजलं; जाणून घ्या सत्ताधारी आणि विरोधकांची नेमकी रणनीती काय आहे?)

महायुती सरकारने घेतला ‘हा’ निर्णय 

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सर्व जाती धर्मांना न्याय देण्याचे काम आम्ही करू. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाला सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं. या फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात कुठलाही भेदभाव होणार नाही. राज्यातील सर्व समाजाला सक्षम करण्यासाठी विविध महामंडळाची व संस्थांची निर्मिती करण्यात आली आहे. कांदा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांदा निर्यात बंदी करू नये असा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. शेतकरी बांधवांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुधाला ५ रुपये अनुदान आपण जाहीर केलं आहे. या योजनांचा फायदा जनतेला होण्यासाठी आपला प्रयत्न आहे.

महायुती सरकारच्या वतीने राज्यातील जनतेच्या हितासाठी सुरू करण्यात आलेल्या विकासाच्या योजना या अविरत सुरू राहतील. छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात विकासाला साथ द्या, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. (DCM Ajit Pawar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.