Property Transfer Fees : विना अर्ज मालमत्ता हस्तांतरण प्रक्रियेची कार्यवाही होणार

201
Property Transfer Fees : विना अर्ज मालमत्ता हस्तांतरण प्रक्रियेची कार्यवाही होणार

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील नोंदणीकृत मालमत्तांसंबधी ज्याप्रमाणे नव्या मालमत्तांची कर आकारणी करुन कर वसूल करणे हे कर संकलन विभागाचे प्रथम महत्त्वाचे काम असून उपरोक्त कामाबरोबर मालमत्तेचे संबंधित योग्य व्यक्तिच्या नावावर हस्तांतरण करणे सुद्धा महत्त्वाचे काम आहे. (Property Transfer Fees)

१५ व्या वित्त आयोगाने महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागास आपल्या विभागाची माहिती पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन विभागाच्या संगणक प्रणालीशी एकात्मीकरण (इंटिग्रेशन) करण्याचे निर्देश दिले होते. उपरोक्त निर्देशाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाचे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन विभागाच्या संगणक प्रणालीशी एकात्मीकरण (इंटिग्रेशन) पुर्ण झाले आहे. त्यामुळे आता नोंदणी व मुद्रांक विभागाच्या मालमत्तेच्या खरेदी-विक्रीबाबतच्या दस्तांबाबत अद्ययावत माहिती संगणक प्रणालीच्या माध्यमातून थेट पिंपरी-चिंचवड महापालिकेला दिनांक ११ ऑक्टोबर २०२४ पासून उपलब्ध होत आहे. यामुळे आता मालमत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुद्धा तात्काळ होणार आहे. यामुळे मालमत्तेची खरेदी किंवा विक्री झाल्यानंतर सदर मालमत्तेचे हस्तांतरण होणारा विलंब यापुढे टाळला जाऊन मालमत्ता हस्तांतरण प्रक्रिया गतिमान होणार आहे. (Property Transfer Fees)

(हेही वाचा – Baba Siddique हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातून चौथी अटक)

सदरची प्रक्रिया ऑनलाइन सेवेद्वारे आपोआप होणार असल्यामुळे नागरिकांना मालमत्ता हस्तांतरणासाठी कोणत्याही प्रकारचा वेगळा अर्ज करण्याची आवश्यकता राहिलेली नाही. किंबहुना नागरिकांनी मालमत्ता हस्तांतरणासाठी अर्ज केला नाही तरी हस्तांतरण प्रक्रिया आपोआप विहित मुदतीत पार पडणार आहे. कारण महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाकडून उपलब्ध होणाऱ्या ऑनलाइन माहितीच्या आधारे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेस मालमत्ता विक्री करणार, मालमत्ता खरेदी करणार, मालमत्ता नोंदणी दिनांक व मालमत्तेचा व्यवहाराचा तपशिल प्राप्त होणार आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सर्वप्रथम मालमत्ता विक्री करणाऱ्याचे नाव, खरेदी करणाऱ्याचे नाव, विक्री मालमत्तेचा संपूर्ण तपशील तपासणार आहे. (Property Transfer Fees)

उपरोक्त तपशील अचूक भरल्याची खात्री झालेनंतर मालमत्तेचे बाजारमूल्य अथवा मुद्रांक शुल्क ज्या रकमेवर भरणा केले आहे यापैकी जी रक्कम सर्वोच्च असेल त्या रकमेवर ०.५० टक्के इतके मालमत्ता हस्तांतरण शुल्काची आकारणी करुन मालमत्ताधारकांस हस्तांतरण शुल्काची एकूण रक्कम ऑनलाइन स्वरुपात भरणा करण्यासाठीची लिंक एसएमएसद्वारे पाठविण्यात येणार आहे. मालमत्ताधारकांनी त्यांना प्राप्त एसएमएसद्वारे मालमत्ता हस्तांतरण शुल्काची रक्कम तात्काळ ऑनलाइन प्रक्रियेद्वारे भरणा करावी. याबरोबरच, मालमत्ताधारकांनी हस्तांतरण शुल्काच्या रकमेचा भरणा विहीत मुदतीत न केल्यास मालमत्ता कराच्या पुढील बिलामध्ये हस्तांतरण शुल्काचा समावेश करण्यात येणार आहे. याचबरोबर, यापुढे ज्यांना मालमत्ता खरेदी अथवा मालमत्ता विक्री करावयाची आहे अशा नागरिकांनी मालमत्तेच्या दस्ताची नोंद करतेवेळी आपला मालमत्ता क्रमांक नमूद करावा. असे कर आकारणी व कर संकलन विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे. (Property Transfer Fees)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.