नाशिक-गुजरात हायवेवर (Nashik-Gujarat Highway) २ जानेवारीच्या पहाटे ५.३० च्या सुमारास भीषण अपघात झाला. सापुतारा घाटात एक खाजगी लक्झरी प्रवासी बस २०० फूट खोल दरीत कोसळली. (accident nashik) या अपघातात ७ जण जागीच ठार झाले, तर १५ प्रवासी जखमी झाले.
(हेही वाचा – अमेरिकेचा ISIS च्या तळांवर एअर स्ट्राइक; ट्रम्प म्हणाले, आम्ही तुम्हाला शोधून शोधून मारू…)
अपघात इतका भीषण होता की, बसचे घाटात कोसळल्यानंतर दोन तुकडे झाले. अपघातस्थळी आता मदत आणि बचावकार्य सुरु आहे. या बसमधील प्रवासी नाशिकहून (Nashik) देवदर्शन आटोपून गुजरातकडे (Gujrat) देवदर्शनासाठी चालले होते. हे प्रवासी मध्यप्रदेशचे रहिवासी आहेत.
बस चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची एक प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे. धुक्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Nashik-Gujarat Highway)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community