PM Modi pens Garba : गरबो गुजरात नी गरवी मिरात छे… पंतप्रधानांनी लिहिले गरब्याचे गीत… 

ध्वनी भानुशालीने पीएम मोदींच्या गरबा गाण्यावर गायलेला व्हिडिओ नवरात्रीच्या मुहूर्तावर रिलीज करण्यात आला आहे. ध्वनी भानुशालीने हे गाणे गायले असून तनिष्क बागचीने या गाण्यासाठी आवाज दिला आहे.

24
PM Modi pens Garba : गरबो गुजरात नी गरवी मिरात छे... पंतप्रधानांनी लिहिले गरब्याचे गीत... 
PM Modi pens Garba : गरबो गुजरात नी गरवी मिरात छे... पंतप्रधानांनी लिहिले गरब्याचे गीत... 

नवरात्रीच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिलेल्या गरबा गाण्यावर आधारित व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे. (PM Modi pens Garba) ध्वनी भानुशालीने हे गाणे गायले असून तनिष्क बागचीने या गाण्यासाठी संगीत दिले आहे. या गाण्याचे निर्माते जॅकी भगनानी आहेत. हे गाणे यूट्यूबवर रिलीज करण्यात आले आहे. चॅनलने लिहिले की, ‘ गरब्या ‘मध्ये पहिल्यांदाच पीएम मोदींनी लिहिलेल्या गाण्यावर तनिष्क बागची यांचे संगीत आणि ध्वनी भानुशालीच्या आवाजाची जादू पाहायला मिळणार आहे. (PM Modi pens Garba)

(हेही वाचा – Manoj Jarange Patil : मराठा आरक्षण द्या अन्यथा … ; मनोज पाटील यांचा सरकारला इशारा)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या गरबा गाण्यावर आधारित म्युझिक व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे. हे गरबा गाणे गुजरातच्या संस्कृतीचा अभिमान आणि वारसा सांगणारे आहे. गुजरातमध्ये नवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो आणि दुर्गामातेची पूजा करताना पंडालमध्ये गरबा खेळण्याची परंपरा आहे. गरबा म्हणजे टाळ्या वाजवून पंडालमधील दुर्गादेवीच्या भोवती गोलाकार केले जाणारे नृत्य !

नरेंद्र मोदींनी हे गरबा गाणे काही वर्षांपूर्वी लिहिले होते. हे गाणे यूट्यूबवर रिलीज करण्यात आले आहे. संगीताची ही जादू नवरात्रीच्या काळात गुजरातची संस्कृती पाहण्याची प्रेरणा देते. नदीम शाह यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. चॅनलने लिहिले, ‘तर तुमची टीम तयार करा, तुमचा दांडिया आणि घागरा तयार करा आणि ‘गारबो’ हे तुमचे नवरात्रीचे गाणे बनवा.

यावर  ध्वनी भानुशालीने ट्विट केले आहे, आम्हाला नवीन ताल आणि रचना असलेले गाणे तयार करायचे होते. त्यांनी चॅनलसाठी लिहिले की, हे गाणे आणि व्हिडिओ जिवंत करण्यात चॅनलने आम्हाला मदत केली.

या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी ध्वनी भानुशालीला टॅग केले आणि थँक यू लिहिले. त्यांनी लिहिले, ‘हे गीत मी वर्षांपूर्वी लिहिले होते. त्यातून अनेक आठवणी जाग्या होतात. मी बर्‍याच वर्षांपासून लिहिले नाही; परंतु गेल्या काही दिवसांत मी एक नवीन गरबा लिहू शकलो, जो मी नवरात्रीच्या काळात शेअर करेन.

पंतप्रधानांनी लिहिलेल्या गरबा गाण्याचे बोल वाचा

गाय तेनो गरबो ने झीले तेनो गारबो,

गरबो गुजरात नी गरवी मिरात छे।

घूमे तेनो गरबो तो झूमे तेनो गरबो,

गरबो गुजरात नी गरवी मिरात छे।

सूर्य चंद्र गरबो ने ट्रैक्टुओ पैन गरबो,

गरबो गुजरात नी गरवी मिरात छे।

तंदु डोलावे ने, मनादु जुमावतो

सवने रे गमतो गरबो

रेडियारी रातो मैं लगाय रेडियमनो

रामतो ने भामतो गरबो… के घुमतो..

हे हया हा, हे हया हा.

ओहू हू हू हू हू

दिवस पान गरबो ने रात पान गरबो

गरबो गुजरात नी गरवी मिरात छे।

संस्कृति गरबो ने प्रकृति गरबो

वंसदि छे गरबो, मोरपींच गरबो ।

गरबो मति छे, गरबो सहमती

वीरनो ए गरबो, अमीरनो ए गरबो।

काया पान गरबो ने जीव पान गरबो,

गरबो जीवन नि हलवी निरात छे।

गरबो सती छे ने गरबो गति छे

गरबो नारी नी फूल नी बिछात छे।

तंदु डोलावे ने, मनादु जुमावतो

सवने रे गमतो गरबो

रेडियारी रातो मैं लगाय रेडियमनो

रामतो ने भामतो गरबो… के घुमतो..

गरबो तो सत छे ने गरबो

अक्षत छेगरबो माताजिनु कंकु रदियात छे (2)

अव्व मा गरबो, स्वभाव मा गरबो

भक्ति चे गरबो, हां शक्ति चे गरबो (2)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.