Police Officer Transfer : राज्य पोलीस दलातील उच्च पदस्थांच्या बदल्यांना मिळाला मुहूर्त 

एटीएस प्रमुख सदानंद दाते आणि ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांना महासंचालक पदावर बढती देत ते सध्या कार्यरत असलेले पद उन्नत करुन त्याच ठिकाणी नियुक्ती दिली आहे.

50

राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या रखडलेल्या Police Officer Transfer बढत्या आणि बदल्यांना अखेर मुहूर्त मिळाला. गृहमंत्रालयाने काही अधिकाऱ्यांना बढत्या देत राज्य पोलीस दलात मोठे फेरबदल केले आहेत. एटीएस प्रमुख सदानंद दाते आणि ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांना महासंचालक पदावर बढती देत ते सध्या कार्यरत असलेले पद उन्नत करुन त्याच ठिकाणी नियुक्ती दिली आहे.

अपर पोलीस महासंचालक बिपिन कुमार सिंह (आर्थिक गुन्हे महाराष्ट्र) यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. तर मनोज लोहिया यांना छत्रपती संभाजीनगर इथं पोलीस आयुक्त बनवण्यात आले आहे. खालील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या Police Officer Transfer झाल्या आहेत.

(हेही वाचा sachin tendulkar birthday : सचिनला वाढदिवशी वडिलांच्या ‘त्या’ सल्ल्याची झाली आठवण)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.